जाहिरात
मराठी बातम्या / Viral / प्रँक करण्याची हौस महागात पडली; तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार, VIDEO बघून डोक्याला हात लावाल

प्रँक करण्याची हौस महागात पडली; तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार, VIDEO बघून डोक्याला हात लावाल

प्रँक करण्याची हौस महागात पडली

प्रँक करण्याची हौस महागात पडली

खरंतर ती आपण भूत असल्याचं दाखवून महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा प्लॅन अपयशी ठरला आणि ती स्वतःच विनोदाचा विषय बनली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 मे : प्रँकचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. तुम्ही असाच प्रँकशी संबंधित अनेक व्हिडिओ आजपर्यंत पाहिले असतील. सहसा, असे व्हिडिओ मजेदार मार्गाने आणि लोकांना हसवण्यासाठी बनवले जातात. परंतु काही प्रँक व्हिडिओ असेही आहेत, जे पाहून लोकांना हसवण्याऐवजी रागच जास्त येतो . त्याचबरोबर असेही काही व्हिडिओ आहेत ज्यात लोकांना प्रँकची चांगलीच किंमत मोजावी लागल्याचं दिसतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो खूपच मजेशीर आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला स्वत: प्रँकची शिकार बनताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महिला बेडवर झोपली आहे, तेव्हा एक मुलगी तिथे एक लहान स्टूल घेऊन येते आणि त्यावर चादर झाकून झोपण्याचा प्रयत्न करते, तिला या महिलेला घाबरवायचं असतं. पण त्याच दरम्यान तिचा तोल बिघडला आणि ती धाडकन खाली पडली. खरंतर ती आपण भूत असल्याचं दाखवून महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा प्लॅन अपयशी ठरला आणि ती स्वतःच विनोदाचा विषय बनली. हा काय चमत्कार? सुकून दगड झालेला ‘मृत’ मासा अचानक जिवंत झाला; पाहा VIDEO ती पलंगावरून खाली पडताच झोपलेली महिला ताबडतोब उठली आणि तिच्या डोक्याला हात लावून विचारपूस करू लागली. हा मजेशीर प्रँक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ‘कधीकधी प्रँक असेही संपतात’, असं कॅप्शनमध्ये मजेशीरपणे लिहिलं आहे. अवघ्या 13 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 56 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी लाईकही केला आहे.

जाहिरात

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, ‘खरोखरंच भूत बनता बनता वाचली’, तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘प्रँक महागात पडला’. त्याचप्रमाणे आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, ‘हा एक धोकादायक स्टंट होता’, तर एकाने म्हटलं ‘हिची बुद्धी भ्रष्ट झाली आहे’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात