JOIN US
मराठी बातम्या / Viral / लई धुतला, गावठी स्टाईलची हाणामारी थेट विमानातच! Video पाहिल्यावर विश्वास नाही बसणार

लई धुतला, गावठी स्टाईलची हाणामारी थेट विमानातच! Video पाहिल्यावर विश्वास नाही बसणार

विमानाच्या आतून घाबरलेल्या लोकांच्या ओरडण्याचा-किंचाळण्याचा आवाज येत आहेत. एक क्रू मेंबर भांडण सोडवण्यासाठी येतो, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण तोही फार काही करू शकत नाही. या लोकांची गावठी स्टाईलने मारहाण सुरूच होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 मे : फ्लाइटमधील भांडणाचा एक धक्कादाक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही जण एकामेकाला मारताना दिसत आहेत. ते एकमेकांना जोरात धक्काबुक्की करत आहेत. त्याचवेळी फ्लाइटच्या आतून लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. बहुतेक प्रवासी फ्लाइटच्या आत या गोष्टीचा विचार करत असतात की, आकाशात विमान असताना कोणतीही अडचण येऊ नये. तथापि, अनेकांना विमानाविषयी एक फोबिया (एक प्रकारची भीती) असते. परंतु नेहमीच क्रू मेंबर्स आणि पायलट सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेत असतात. पण, असे काही करामती प्रवासी विमानात देखील असतात, जे तेथे सुद्धा मारामारी करू शकतात. मात्र, त्यांच्या या कृत्याने इतर प्रवाशांचा जीव घशात येतो. KLM (Klm फ्लाइट) च्या फ्लाइटमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला. अचानक या फ्लाइटमधील 6 प्रवाशांमध्ये भांडण झाले. त्यांनी विमानाच्या मध्यभागी एकमेकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात (shocking video of fighting in flight) केली. हे वाचा -  पाक बॉर्डरवरील भुयाराचे Photo आले समोर, 265 फूट ऑक्सिजन पाईपही सापडला विमान मँचेस्टरहून अॅमस्टरडॅमला जात असताना काही लोक एकमेकांना जोरजोरात बुक्यांनी मारहाण करत होते, हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. विमानाच्या आतून घाबरलेल्या लोकांच्या ओरडण्याचा-किंचाळण्याचा आवाज येत आहेत. एक क्रू मेंबर भांडण सोडवण्यासाठी येतो, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण तोही फार काही करू शकत नाही. या लोकांची गावठी स्टाईलने मारहाण सुरूच होती.

संबंधित बातम्या

मात्र, हा वाद नेमका कशावरून सुरू झाला हे कळू शकले नाही. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे वाचा -  धक्क्दायक! आनंदाचा क्षण दुःखात बदलला; लग्नाच्या वरातीत नाचताना नवरदेवाचा मृत्यू 45 सेकंदाच्या या व्हिडिओला वृत्त लिहिपर्यंत 12.50 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून क्रू मेंबरने फोन करून पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी त्या 6 मुलांना ताब्यात घेतले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या