मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशात घातपाताचा कट? पाक बॉर्डरवरील भुयाराचे Photo आले समोर, 265 फूट ऑक्सिजन पाईपही सापडला

देशात घातपाताचा कट? पाक बॉर्डरवरील भुयाराचे Photo आले समोर, 265 फूट ऑक्सिजन पाईपही सापडला

जम्मू-काश्मीरच्या सांबा (SAMBA) जिल्ह्यात सीमेपलीकडे जाणारे एक भुयार आपण शोधून काढल्याचे सीमा सुरक्षा दलाने (BSF) म्हटले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 48 बटालियनच्या सीमा चौकी असलेल्या चक फकिरा परिसरात पाकिस्तानी भुयार आढळून आला.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 6 मे : जम्मू-काश्मीरच्या सांबा (SAMBA) जिल्ह्यात सीमेपलीकडे जाणारे एक भुयार आपण शोधून काढल्याचे सीमा सुरक्षा दलाने (BSF) म्हटले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 48 बटालियनच्या सीमा चौकी असलेल्या चक फकिरा परिसरात पाकिस्तानी भुयार आढळून आला. ही घटना बुधवारी समोर आली. तर तेच दुसरीकडे गुरुवारी गुरुवारी भारत-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांच्या बोगद्यात सुमारे 265 फूट ऑक्सिजन पाईप सापडला आहे. यातून मोठा कट रचण्याची तयारी होती.

पाईप मिळाल्यानंतर सीमा सुरक्षा दल सतर्कतेने शोध मोहीम राबवत आहे. हा भुयार आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या 150 मीटर अंतरावर आहे. ही पाकिस्तान पोस्ट चमन खुर्दपासून फक्त 900 मीटर अंतरावर आहे. बुधवारी बीएसएफच्या विशेष तपासणी मोहिमेत हे आढळून आले. यामुळे, आगामी अमरनाथ यात्रेत अडथळे आणण्याचे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात आल्याचा दावा बीएसएफने केला. यानंतर जम्मू विभागात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

बोगद्याचे अंतर किती आहे -

>> बीएस कुंपणापासून अंतर - अंदाजे -50 मी

>> IB पासून अंतर - अंदाजे -150 मीटर

>> चमन खुर्द कलान गावापासून अंतर अंदाजे - 1600 मीटर

>> पाकिस्तान पोस्ट चमन खुर्द (फियाज) पासून अंतर - 900 मीटर

>> चक फकिरा गावापासून अंतर - अंदाजे - 700 मीटर

>> बीओपी चक फकिरा पासून अंतर - अंदाजे - 300 मीटर

हे वाचा - सेल्फीकरता बुरखा हटवाल तर... मुस्लीम संघटनांचा महिलांविरोधात अजब फतवा

ऑक्सिजन पाईप

ऑक्सिजन पाईप

याआधीही आढळले बोगदे -

सीमेपलीकडे जाण्यासाठी दहशतवादी अशा अनेक डावपेचांचा अवलंब करत असतात, अशी अनेक माहिती दररोज उपलब्ध होत असते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. याआधीही अनेक बोगदे सापडले आहेत. याआधीही बीएसएफने जम्मूच्या वेगवेगळ्या भागात पाकिस्तानी बोगदे शोधून काढले आहेत. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी हा भुयार सीमेपलीकडून बांधण्यात आला होता. कठुआच्या हिरानगर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक भुयारही सापडला होता. तर ऑगस्ट 2020 मध्ये सांबाच्या सीमावर्ती गाव बेन ग्लॅडच्या सीमेवर एक भुयार सापडला होता. सीमेपासून 50 मीटर अंतरावर सापडलेल्या या बोगद्यात पाकिस्तानी बनावटीची पोती सापडली होती आणि त्यात वाळूने भरलेली होती.

First published:

Tags: BSF, Jammu kashmir