सूरत 06 मे : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. नवरी आणि नवरदेव अतिशय उत्साहाने नाजत-गाजत आपला हा खास दिवस आणखी अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतात. मात्र काहीवेळा लग्नसमारंभादरम्यान अशा घटना घडतात, ज्याचा कोणी विचारही केलेला नसतो. गुजरातमधील सुरतमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात वरात निघण्यापूर्वी मित्रांसोबत डीजेवर नाचत असताना नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं (Groom Dies While Dancing before Marriage).
मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह, भररस्त्यात लोकांच्या देखत तरुणाचा भयंकर शेवट
हे प्रकरण सूरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावातील आहे. 33 वर्षीय मितेश भाई चौधरी यांची वरात बालोद तालुक्यातील धामंडळा गावात जाणार होती. वरात निघण्यापूर्वी बहुतांश विधी पूर्ण करण्यात आले. थोड्याच वेळात वरात निघणार होती. आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेवर नाचत होते. मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही नाचण्याची इच्छा झाली आणि तोही डीजेजवळ पोहोचला. दरम्यान, नाचत असलेल्या मितेशला त्याच्या मित्रांनी खांद्यावर उचलून घेतलं आणि नाचायला सुरुवात केली. त्यानंतर अचानक मितेशच्या छातीत दुखू लागलं.
पत्नी अन् दोन मुलींना स्फोटकांनी उडवलं; रिक्षात फिट केलं मृत्यूचं सामान, बसताच मोठा ब्लास्ट
कुटुंबीयांनी तात्काळ मितेशला मोटरसायकलवर बसवून स्थानिक रुग्णालय गाठलं. जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून बारडोली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही माहिती मिळताच चौधरी कुटुंबावर शोककळा पसरली. लग्नाच्या काही तास आधीच नवरदेवाच्या मृत्यू झाल्यानं हा आनंदाचा क्षण दुःखात बदलला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Heart Attack, Wedding