JOIN US
मराठी बातम्या / Viral / लेकीच्या हट्टापायी वडिलांनी बांधला वाळवंटात तलाव; आजपर्यंत कधीच नाही आटलं पाणी

लेकीच्या हट्टापायी वडिलांनी बांधला वाळवंटात तलाव; आजपर्यंत कधीच नाही आटलं पाणी

कितीही दुष्काळ आला, वाळवंट कडकडून तापलं तरी या तलावाचं पाणी मात्र कधीच आटत नाही. वर्षाच्या बारा महिने हे तलाव ओलसर राहतं.

जाहिरात

डझनभर गावांना दररोज पन्नास टँकर भरून पाणी द्यायची या तलावाची क्षमता आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रतापा‌ राम, प्रतिनिधी जैसलमेर, 12 जून : राजस्थानच्या वाळवंटावर निसर्गाने कधीच दया दाखवली नाही. याठिकाणी कडक उन्हात कधीच गारवा जाणवला नाही.पाणीटंचाई तर जणू इथल्या लोकांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. मात्र अशा परिस्थतीतही इथल्या लोकांनी जगण्याची आशा कधी सोडली नाही. खरंतर इथल्या जिवंतपणाची साक्ष येथील एक तलावसुद्धा देतं. कितीही दुष्काळ आला, वाळवंट कडकडून तापलं तरी या तलावाचं पाणी मात्र कधीच आटत नाही. वर्षाच्या बारा महिने हे तलाव ओलसर राहतं. शतकानुशतके इथल्या गावांची तहान भागवत ते आपल्या जागी अगदी थाटात उभं आहे. हे तलाव म्हणजे निसर्गाचाच चमत्कार आहे, असं इथले लोक मानतात. अनेकदा तीन-चार वर्ष पाऊस न पडूनही ते कधीच कोरडे पडले नाही. महत्त्वाचं म्हणजे डझनभर गावांना दररोज पन्नास टँकर भरून पाणी द्यायची या तलावाची क्षमता आहे.

पर्यटकांसाठी हे तलाव म्हणजे आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. 600 वर्षांपूर्वी पालीवाल संस्कृतीच्या काळात या तलावाजवळच्या जाझिया गावात पालीवाल जातीच्या एका श्रीमंत व्यक्तीच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यावेळी पाण्यासाठी पाणीहारीला जावं लागत असे. या मुलीचं नाव होतं जशोदा. एके दिवशी ती घागर घेऊन विहिरीवर पाणी भरायला गेली. त्याठिकाणी एक गुराखी आपल्या गुरांना पाणी देत होता. विहिरीत भरपूर पाणीसाठा होता मात्र तिचं घर विहिरीपासून फार लांब होतं. त्यामुळे जशोदाने गुराख्याला पाणी भरण्यास मदत करण्याची विनंती केली. मात्र त्याने तिला नकार दिला. याबाबत जशोदाने घरी जाऊन सांगितल्यावर तिच्या सासरच्यांनी इथे एवढंच पाणी मिळतं आणि एवढ्या लांबून पाणी भरायला कंटाळा येत असेल तर तुझ्या वडिलांना सांग दारात तलाव बांधून द्यायला, असं म्हणून तिचा अपमान केला. Sukanya Arun Kadam Baby Shower : अरुण कदमच्या लेकीने डोहाळे जेवणासाठी परिधान केला खास दागिना; बाजारात आहे मोठी मागणी या घटनेमुळे तिचा मान अतिशय दुखावला गेला आणि तिने ही बाब तिच्या वडिलांना जाऊन सांगितली. मला माझ्या दारात तलाव हवा, असा हट्टच तिने धरला. मग मुलीचा हट्ट पुरवत तिच्या श्रीमंत वडिलांनी लेकीच्या एका शब्दावर डेढा गावातील आगोर येथील जाजिया गावाजवळ तलाव बांधला. सुमारे 15 फूट खोल असा हा तलाव आहे. तलावाच्या मधोमध एक विहीर आहे. मात्र तलावाचं पाणी कधीच आटत नसल्यामुळे ही विहीर दिसत नाही. शिवाय तलावावर दोन मंदिरंदेखील आहे. जशोदाचे वडील जसराज यांनी बांधलेलं हे तलाव आज प्रचंड प्रचलित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या