JOIN US
मराठी बातम्या / Viral / कांगारूला त्रास देत होता व्यक्ती; त्याने असा घेतला बदला की...; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

कांगारूला त्रास देत होता व्यक्ती; त्याने असा घेतला बदला की...; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

कांगारू त्या माणत्याच्या खांद्याला पकडतो आणि पायाने त्या व्यक्तीला मारायला सुरुवात करतो. कांगारूलाही राग आल्याने त्याने त्या माणसाचा चांगलाच बदला घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : एखाद्याने माणसाला त्रास दिला तर जसा माणसाला राग येतो, नंतर तो त्याचा बदला घेतो अशा अनेक घटना ऐकीवात आहेत. पण केवळ माणूसच नाही, तर प्राण्यांनाही राग येतो. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (viral video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. या व्हिडीओमध्ये एक कांगारू एका माणसाला मारत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने सुरक्षा रक्षकाप्रमाणे कपडे घातल्याचं दिसतंय. त्याच्याजवळ एख कांगारू उभा आहे. तो व्यक्ती कांगारूला त्रास देऊ लागतो. तो सारखं कांगारूला हात मारण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी कांगारू काही करत नाही. पण काही वेळाने कांगारूला राग येतो आणि तो त्या माणसाकडे जातो.

(वाचा -  Cute कुत्रा आरशात पाहून करतोय मजेदार काम, पाहा तुफान व्हायरल VIDEO )

कांगारू त्या माणत्याच्या खांद्याला पकडतो आणि पायाने त्या व्यक्तीला मारायला सुरुवात करतो. कांगारूलाही राग आल्याने त्याने त्या माणसाचा चांगलाच बदला घेतल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ नेचर अँड एनिमल्स नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या पेजवर अनेकदा वाईल्ड लाईफ आणि जनावरांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. या व्हिडीओला युजर्सची मोठी पसंतीही मिळते. हा कांगारूचा व्हिडीओ 27 जानेवारी रोजी रात्री शेअर करण्यात आला आहे.

आतापर्यंत 5000 हून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. त्याशिवाय 1400 वेळा व्हिडीओ रिट्विट करण्यात आला आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओ विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या