JOIN US
मराठी बातम्या / Viral / जुगाऱ्याने दिलेल्या लॉटरीमुळे भिकाऱ्यांच नशीब फळफळलं; आता आलिशान घराचं स्वप्न पूर्ण

जुगाऱ्याने दिलेल्या लॉटरीमुळे भिकाऱ्यांच नशीब फळफळलं; आता आलिशान घराचं स्वप्न पूर्ण

एक नाही तर चार भिकाऱ्यांना याचा फायदा झाला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फ्रान्स, 9 ऑक्टोबर : देणारा जेव्हा देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, असं एक वाक्य प्रचलित आहे. त्याचाच प्रत्यय चार भिकाऱ्यांना आला आहे. एका जुगाऱ्याने भिकाऱ्यांना भीकमध्ये लॉटरीचं तिकीट दिलं आणि भिकाऱ्यांचं नशीब फळफळलं.  फ्रेंच लॉटरी संचालक एफडीजे (French lottery operator FDJ) यांनी मंगळवारी सांगितले की, जुगाऱ्याकडून (Gambler) भीकमध्ये मिळालेल्या लॉटरीमुळे ते लखपती झाले. हे ही वाचा- अतिशहाणपणा करून सेक्सपूर्वी Condom ला केला छेद; 4 वर्षांची झाली जेल ऐरवी चार जणांकडून पैसे मागून पोट भरणाऱ्या भिकाऱ्यांना अचानक मिळालेल्या या लाभामुळे अत्यानंद झाला आहे. या पैशातून त्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय होऊ शकणार आहे. चार बेघर लोकांना (Four homeless people) जुगाराने लॉटरीची तिकीटं दिली होती. त्यांना तब्बल 50 हजार यूरोची (43 लाख रुपयांहून जास्त) लॉटरी लागली. तब्बल 30 वर्षांच्या वयाचे चारजणं ब्रेस्टच्या वेस्टर्न पोर्ट सिटीच्या एका लॉटरी शॉपच्या बाहेर भीक मागत होते. एका व्यक्तीने एक युरोचं तिकीट घेतलं आणि ते भीकमध्ये दिलं. ऑपरेटरने दिलेल्या वक्तव्यानुसार जेव्हा चार तरुणांना पाच युरो नाही तर 50000 युरो मिळाल्याचं तकळलं तेव्हा ते हैराण झाले. FDJ ने सांगितले की चौघांनी जॅकपॉट सर्वांमध्ये सारखं वाटून घेतलं आहे. इतकी मोठी रक्कम मिळाल्यामुळे त्यांना आता भीक मागण्याची गरज नाही, तर ते आपल्या आलिशान घराचं स्वप्न पूर्ण करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या