ब्रिटन, 07 ऑक्टोबर : गर्भधारणा टाळण्यासाठी आणि सुरक्षित सेक्ससाठी (sex) कंडोमचा (Condom) वापर केला जातो. मात्र यूकेतील (UK) 47 वर्षीय व्यक्तीने अतिशहाणपणा केला. त्याने सेक्स करण्यापूर्वी कंडोमला छेद (puncturing condom) केला. असा छेद केलेला कंडोम वापरून त्याने सेक्स केलं आणि आता त्याला यासाठी तब्बल 4 वर्षांची जेल झाली आहे. बलात्काराच्या (rape) गुन्ह्याखाली त्याला शिक्षा झाली आहे. यूकेतील अँड्र्यू लेविसच्या (Andrew Lewis) गर्लफ्रेंडने त्याला कंडोमसह सेक्स करायला परवानगी दिली. सेक्स करताना प्रत्येकवेळी ते कंडोमचा वापर करायचे. मात्र एक दिवस त्याच्या गर्लफ्रेंडला कंडोमला छेद असल्याचं समजलं. तिने बेडजवळील ड्रॉव्हर तपासला त्यात तिला पिन आणि छेद असलेले कंडोम सापडले. तिनं डस्टबिनमध्ये वापरलेले कंडोमही तपासले, त्यांनाही छेद होता. यानंतर तिनं अँड्र्यूविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. डेली मेल च्या रिपोर्टनुसार ही घटना आहे मार्च 2018 मधील, वॉर्सेस्टर क्राऊन कोर्टात (Worcester Crown Court) 2 ऑक्टोबरला याबाबत सुनावणी झाली. सुरुवातीला अँड्र्यूने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले मात्र नंतर त्याने आपणच कंडोमला छेद केल्याची कबुली दिली. गर्लफ्रेंडसह इंटिमेसी वाढवण्यासाठी त्याने असं केल्याचं सांगितलं. हे वाचा - चेष्टा-मस्करीला काही मर्यादा असते! गुदद्वारात हवा भरल्यामुळे तरुणाचा मृत्यू महिलेच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं, अँड्र्यूने कंडोम फाटून इंटिमेसी वाढेल यासाठी असं केल्याचं पोलिसांना याआधी सांगितलं. तर अँड्र्यूच्या वकिलांनी, त्याला इंटिमेसी वाढवायची होती, महिलेला प्रेग्ननंट करण्याचा त्याचा उद्देश नव्हता. महिलेला गर्भनिरोध निवडण्याचा अधिकार आहे. पण अँड्र्यूला ते फाटावं असं वाटत होतं जेणेकरून तिचं मन बदलेल, असं सांगितलं. न्यायाधीशांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय दिला. महिलेला मूल नको होतं हे तिनं स्पष्ट केलं होतं. तिनं कंडोमसह सेक्स करायला परवानगी दिली होती. हा विश्वासाचा मुद्दा आहे. विश्वासघात करून त्याने महिलेवर बलात्कार केला आहे. असं म्हणत कोर्टाने अँड्र्युला चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.