JOIN US
मराठी बातम्या / Viral / तुम्ही देखील लॅपटॉपवर F5 दाबता का? यामुळे नक्की काय होतं तुम्हाला माहितीय?

तुम्ही देखील लॅपटॉपवर F5 दाबता का? यामुळे नक्की काय होतं तुम्हाला माहितीय?

आपल्यापैकी बहुतेकांना रिफ्रेश बटण वारंवार दाबण्याची सवय असते. जे शॉर्टकट की F5मध्ये आहे. रिफ्रेश बटण दाबल्याने लॅपटॉपचा वेग वाढतो हे आपण सर्वांनी नेहमीच ऐकले आहे. पण यात किती तथ्य आहे ते जाणून घेऊया…

जाहिरात

सोेर्स : सोशल मीडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 मे : आजकाल जवळ-जवळ सर्वांकडेच कंप्युटर आणि लॅपटॉप आहेत किंवा कामाच्या ठिकाणी ते वापतात. याच्या किबोर्डवर तुम्ही पाहिले असेल की अनेक किज आहेत. त्यांपैकी काही बटणं आहेत, तर काही शॉर्टकट किज आहेत. कीबोर्डचे प्रत्येक बटण कोणत्या ना कोणत्या फंक्शनसह येते आणि त्याची सर्व बटणे देखील आवश्यक आहेत. कंम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरणारे लोक काही बटणे अनेक वेळा वापरतात, तर काही बटणे फार कमी वेळा वापरतात. आपल्यापैकी बहुतेकांना रिफ्रेश बटण वारंवार दाबण्याची सवय असते. जे शॉर्टकट की F5मध्ये आहे. रिफ्रेश बटण दाबल्याने लॅपटॉपचा वेग वाढतो हे आपण सर्वांनी नेहमीच ऐकले आहे. पण यात किती तथ्य आहे ते जाणून घेऊया… … तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकिट असून देखील भरावा लागेल दंड, भारतीय रेल्वेचा हा नियम माहितीय का? F5 दाबल्याने वेग वाढतो का? बर्‍याच लोकांना वाटते की, डेस्कटॉपवर रिफ्रेश कमांड वापरल्याने काही मेमरी मोकळी होईल आणि वापरकर्ते अधिक जलद काम करतील. परंतु सत्य हे आहे की डेस्कटॉपवरील रिफ्रेश फंक्शन केवळ स्क्रीन आणि आयकॉन्स रिफ्रेश करते, सिस्टम मेमरी नाही. सिस्टम मेमरी मोकळी करण्यासाठी, काही अनावश्यक गोष्टी हटवणे आवश्यक आहे. रिफ्रेश बटणाचे खरे काम हे आहे, जेव्हा तुम्ही डेस्कटॉपच्या चिन्हांमध्ये काही बदल करता. डेस्कटॉपवरील आयकॉन त्यांच्या प्लेसमेंटमध्ये व्यवस्थित दिसतात, यासाठी ‘रिफ्रेश’ बटण दाबणे आवश्यक आहे. परंतु सहसा लोक रिफ्रेश बटण पुन्हा पुन्हा दाबतात कारण त्यांना वाटते की यामुळे त्यांच्या कंप्युटरचा वेग वाढेल. पण अगदी उलट आहे. ही केवळ एक वाईट सवय आहे, ज्याचे काही लोकांना व्यसन होते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे अनेक लोक काम करतात वारंवार F5 हे बटण दाबतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या