JOIN US
मराठी बातम्या / Viral / गाडीतून उडी मारली अन् वाचला जीव समोर आला बर्निंग कारचा थरारक VIDEO

गाडीतून उडी मारली अन् वाचला जीव समोर आला बर्निंग कारचा थरारक VIDEO

धावत्या कारला अचानक आग लागली. त्यावेळी, कार चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपूर, 08 ऑक्टोबर : गाडीतून धूर येतो आणि आग लागल्याच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. दोन दिवसांपूर्वी गाडीतल्या सिलिंडरच्या स्फोट होऊन ओमनी व्हॅन जळून खाक झाल्याची घटना ताजी असताना आता आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. कार घेऊन जात असताना अचानक कारला आग लागली आणि काही समजण्याच्या आतच चालकानं गाडीतून आपला जीव वाचवण्यासाठी उडी घेतली. कार चालकानं काही सेकंदाचा उशीर केला असता तर गाडी लॉक झाली असती आणि मोठा अनर्थ घडला असता. कारण चालकानं उडी मारल्यानंतर काही सेकंदात संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी होती. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरात घडली आहे.

हे वाचा- किरकोळ वादातून वाहिले रक्ताचे पाट, 2 गटांमधील तुबंळ हाणामारीचा VIDEO VIRAL कानपूर परिसरातपोलिस स्टेशन परिसरातील मोती लेक पार्कजवळ एका धावत्या कारला अचानक आग लागली. त्यावेळी, कार चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला. आग पाहताच काही क्षणातच आगीने संपूर्ण वाहन भस्मसात केले आणि परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलानं घटनास्थळी पोचेपर्यंत संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यसाठी होती. स्थानिकांनी दिलेल्या ही गाडी अशोक नगर चौकातून स्वरूप नगरकडे जात होती. गाडीतून सुरुवातीला धूर आला आणि नंतर काही सेकंदात आग लागली. सुदैवानं मोठा अनर्थ घडला नाही. मात्र चालकानं वेळीच गाडीतून उडी मारल्यानं त्याचे प्राण वाचले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या