आजमगड, 08 नोव्हेंबर : एका छोट्याशा वादावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन गट आमने-सामने आले आणि दोन्ही गटांमध्ये लाठी-दांडूक आणि धारदार शस्त्रांसह हाणामारी झाली आहे. दोन गटांनी एकमेकांवर हल्ला केला. यामध्ये परिसरात मोठा तणाव निर्माण झालं होतं. उत्तर प्रदेशातील आजमगढ इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या वादामध्ये 5 लोक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धारदार शस्त्र घेऊन काही लोक घरात घुसले आणि त्यांनी कुटुंबीयांवर हल्ला केला. यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जणांची प्रकृती अत्यावस्थ आहे. या दरम्यान हल्ला करणाऱ्यांनी महिलांसोबत देखील अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे वाचा- नवी मुंबईत अनधिकृत हुक्का पार्लरवर धाड, तब्बल 211 तरुण-तरुणी ताब्यात दोन गटांमध्ये नेमका वाद कशामुळे उफाळून आला याबाबद अद्याप माहिती समोर आली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.शकुंतला देवी पत्नी हरिश्चंद्र शर्मा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तातडीनं कठोर कारवाईची मागणी केली आहे. आजमगड जिल्ह्यातील मुबारकापूर पोलीस ठाणा क्षेत्रात ही घटना समोर आली आहे. एक शुल्लक कारणातून हा वाद उफाळून आला आणि दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तक्रार दाखल करण्याचं काम सुरू आहे.