JOIN US
मराठी बातम्या / Viral / viral video : महामार्गावर सुसाट बाईक चालवून करत होता 'नागिणी डान्स', पण चूक झाली अन् कंबरडंच मोडलं

viral video : महामार्गावर सुसाट बाईक चालवून करत होता 'नागिणी डान्स', पण चूक झाली अन् कंबरडंच मोडलं

मार्केटमध्ये कोणती नवी बाइक आलीये याकडे तरुणमंडळींचं लक्ष असतं. शिवाय नवनवीन गाड्या खरेदी करण्याची जणू स्पर्धाच असते. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशिक्षणाशिवाय कोणीही वाहनांशी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्नही करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

जाहिरात

दोघं मस्त स्टंटबाजी करत बाइक चालवत होते. शिवाय दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रामकुमार नायक, प्रतिनिधी धमतरी, 7 जुलै : आजकाल तरुणांमध्ये बाइकची प्रचंड क्रेझ आहे. मार्केटमध्ये कोणती नवी बाइक आलीये याकडे तरुणमंडळींचं लक्ष असतं. शिवाय नवनवीन गाड्या खरेदी करण्याची जणू स्पर्धाच असते. बाइकवर जीवघेणे स्टंटही मोठ्या आवडीने केले जातात. असाच एक स्टंट छत्तीसगडच्या दोन तरुणांना चांगलाच महागात पडला. दोघं थेट शेतात कोसळून डोक्यावर आदळले. रायपूरचे निवासी ओम निर्मलकर आणि सुनील देवांगन हे दोघं केरे गावात नातेवाईकांकडे गेले होते. तिथून कामानिमित्त ते धमतरीला निघाले. दोघं मस्त स्टंटबाजी करत बाइक चालवत होते. शिवाय दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं. अशातच स्टंटबाजी त्यांना भोवली आणि कोडेबोड गावाजवळ त्यांचं बाइकवरील नियंत्रण सुटलं. एका पोलला आदळून दोघंही शेतात फेकले गेले, हेल्मेट नसल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली.

तरुणांच्या किंकाळ्या ऐकून गावकरी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. पोलीसही त्याठिकाणी पोहोचले आणि दोघांना अभनपूरच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे प्रथमोपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना रायपूरला हलवण्यास सांगितलं. आता रायपूरमधील एका रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत. ‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री झाली आई; बॉलिवूडपासून दूर परदेशात राहून करतेय ‘हे’ काम दरम्यान, प्रशिक्षणाशिवाय कोणीही वाहनांशी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्नही करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच सदर प्रकरणातील तरुण नशेत गाडी चालवत होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या