JOIN US
मराठी बातम्या / Viral / वाह वाह, वाह वाह! इतकी जबरदस्त कव्वाली म्हटली, धाडकन स्टेजच कोसळला; Watch Video

वाह वाह, वाह वाह! इतकी जबरदस्त कव्वाली म्हटली, धाडकन स्टेजच कोसळला; Watch Video

महिलेने कव्वाली म्हणायला सुरुवात केली तोच स्टेज कोसळला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

कव्वाली कार्यक्रमात दुर्घटना.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मो. इकराम/रांची, 26 फेब्रुवारी : कव्वालीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात अचानक दुर्घटना घडली. जबरदस्त कव्वाली म्हटली जात असताना अचानक धाडकन स्टेज कोसळला. हे दृश्य तिथंच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कुणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. जो पाहून तुम्हाला सुरुवातीला धडकी भरेल पण नंतर हसूही आवरणार नाही.

 झारखंडच्या धनबादमधील ही घटना आहे. कतरासमध्ये कव्वालीचा कार्यक्रम होता. जोनपूर आणि दिल्लीहून कव्वाली गायक आले होते. त्यांच्यात जुगलबंदी सुरू होती. संपूर्ण कार्यक्रम ‘शबाब’वर होता. कव्वालीची जुगलबंदी अगदी रंगात आली होती. समोर प्रेक्षक होते, जे याचा पुरेपूर आनंद घेत होते. पण त्याच क्षणी असं काही घडलं ज्याचा कुणी विचारही केला नाही.

‘श्रीमंत’ भिकारी! पोटासाठी भीक मागूनही असं काम, पैसेवाल्यांनाही वाटेल लाज; दान केले 50 लाख

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कव्वाली गायक एकमेकांसमोर उभे आहेत. महिला कव्वाली म्हणायला सुरुवात करते. तिने ‘लग रहा है मुझे आप नाराज हैं’ अशी कव्वालीची सुरुवातीची एक ओळ घेते. ‘तो मुस्कुरा दीजिए’ असं ती म्हणते आणि तितक्यात नको तेच घडलं. अचानक स्टेजता निम्मा भाग कोसळला आणि स्टेजवरील सर्वजण खाली कोसळले.

सुरुवातीला कलाकार स्टेजवर बसले होते. आयोजकांच्या आग्रहानंतर ते स्टेजवर उभे राहिले आणि असं घडून बसलं.

 

स्टेजवर कलाकारांह बरेच लोक होते, जे खाली पडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. काही जणांना गंभीर जखम झाली आहे. तरी कसंबसं करून काही वेळाने हा कार्यक्रमा पुन्हा सुरू करण्यात आल आहे.

Pink elephant video : अद्भुत! कॅमेऱ्यात कैद झाला गुलाबी हत्ती; कधीच पाहिला नसेल असा दुर्मिळ VIDEO

गुरूवारी रात्री तीनच्या सुमारची ही घटना आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. न्यूज 18 लोकल या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या