मुंबई, 25 फेब्रुवारी : हत्तीचा रंग कोणता असं विचारलं तर तुम्ही करडा म्हणाल. पण कधी गुलाबी हत्ती पाहिला आहे का? हत्ती आणि गुलाबी, कसं काय असू शकेल, गुलाबी हत्ती असूच शकत नाही, असंच तुम्ही म्हणाल. पण अशाच पिंक एलिफन्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. गुलाबी हत्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये हत्तींचेही व्हिडीओ असतात. आतापर्यंत तुम्ही हत्तींच्या पिल्लांचे मजेशीर व्हिडीओ पाहिले असतील. पण असा गुलाबी क्युट हत्ती कधीच नाही. नदीच्या पाण्यात पोहोणारा हा गुलाबी हत्ती. असा हत्ती तुम्ही आजवर आयुष्यात कधीच पाहिला नसेल. हत्ती दुर्मिळ असं रूप, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या गुलाबी हत्तीकडे सर्वजण आकर्षित होत आहेत.
MALA MALA GAME RESERVE युट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नदीच्या पाण्यात काही हत्तींचा कळप आहे. बहुतेक हत्ती मोठे आहेत. पण त्यांच्यासमोर एक छोटा हत्ती आहे. ज्याचा रंग इतर हत्तींपेक्षा वेगळा आहे. बाकीचे हत्ती करड्या रंगाचे असताना हत्तीचं हे छोटंसं पिल्लू मात्र गुलाबी रंगाचं आहे. हा हत्ती पाण्यात पोहोण्याचा प्रयत्न करत आहे, पाण्यात खेळत आहे. हे दृश्य दुर्मिळ असल्याचं सांगितलं जातं आहे. हे दृश्य मलावठी ओपन एरियातील असल्याचं सांगितलं जातं आहे. पण खरंच या हत्तीच्या त्वचेचा नैसर्गिक रंग गुलाबी आहे की आणखी काही कारण आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elephant, Viral, Viral videos, Wild animal