मराठी बातम्या /बातम्या /Viral /'श्रीमंत' भिकारी! पोटासाठी भीक मागूनही असं काम, पैसेवाल्यांनाही वाटेल लाज; दान केले 50 लाख

'श्रीमंत' भिकारी! पोटासाठी भीक मागूनही असं काम, पैसेवाल्यांनाही वाटेल लाज; दान केले 50 लाख

दानशूर भिकारी

दानशूर भिकारी

भिकाऱ्याने भीक मागून जे काम केलं ते कित्येक श्रीमंतांना त्यांच्याकडे इतके पैसे असूनही जमत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Tamil Nadu, India

चेन्नई, 26 फेब्रुवारी : प्रत्येक जण जे काही करतो ते आपलं पोट भरण्यासाठी करतो. कुणी व्यवसाय करतो, कुणी नोकरी करतं, कुणी मजुरी करतं, तर कुणी आपलं कौशल्य वापरून पैसे कमवतो. ज्यांना काहीच शक्य नाही किंवा परिस्थितीसमोर त्यांचं काहीच चालत नाही, ते भीक मागून आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका भिकाऱ्याने भीक मागून जे काम केलं, जे कित्येक पैसेवालेही करत नाहीत. भिकाऱ्याची श्रीमंती पाहून श्रीमंताना लाज वाटेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एका भिकाऱ्याने चक्क 50 लाख रुपये दान केले आहेत.

तामिळनाडूतील एक भिकारी जो गेली कित्येक वर्षे भीक मागून आपलं पोट भरतो आहे. त्याने भीक मागून मागून जमा झालेले आपले 50 लाख रुपये दान केले आहेत. पुलपांडियन असं या भिकाऱ्याचं नाव आहे. 72 वर्षांचा पुलपांडियन तुतूकडी जिल्ह्यातील आहे. त्याने सीएम रिलीफ फंडमध्ये गरजू आणि गरिबांच्या मदतीसाठी लाखो रुपये दान केले आहेत.

रस्त्यावरील साध्या मोचीची श्रीमंती पाहून सर्वजण थक्क; VIDEO तुफान VIRAL

सर्वात आधी मे 2020 साली त्याने 10 हजार रुपये दान केले. त्यानंतर त्याचं दानकार्य सुरूच राहिलं. कोरोना कालावधीतही त्याने 90000 हजार रुपये दान केले. तो कित्येक जिल्ह्यांमध्ये गेला. तिथं फिरून त्याने भीक मागितली. ज्या जिल्ह्यांत त्याने भीक मागितली त्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्याने दानही केलं. आतापर्यंत 8 जिल्ह्यांत जाऊन तिथल्या सीएम रिलीफ फंडमध्ये प्रत्येकी 10  हजार रुपये दिले.अशी आतापर्यंत त्याच्या दानाची एकूण रक्कम 50 लाख रुपयांवर पोहोचली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने सांगितलं, त्याचं कुटुंब नाही, तो एकटाच आहे. भीक मागून पैसे मिळतात ते त्याच्या गरजेपेक्षा जास्त आहेत. म्हणून तो ते अतिरिक्त पैसे दान करतो. ज्या जिल्ह्यात जाऊन भीक मागून पैसे मिळतात ते तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात गरिबांच्या मदतीसाठी दान म्हणून देतो.

करोडपती होण्याची संधी! मिळतायेत 10 कोटी रु., पण घेण्यासाठी कुणीच पुढे येईना; नेमकं प्रकरण काय?

तुम्हा आम्हा सर्वांसमोर हा भिकारी. जो भीक मागून पैशांनी श्रीमंत झालाच पण त्याने मनाचीही श्रीमंती दाखवली.  त्यामुळे खरा श्रीमंत कोण? ते आता तुम्हीच सांगा.

First published:
top videos

    Tags: Tamilnadu, Viral