JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIRAL VIDEO - अंगावर घातलेल्या शर्टातून अचानक येऊ लागला विचित्र आवाज; आत डोकावताच फुटला घाम

VIRAL VIDEO - अंगावर घातलेल्या शर्टातून अचानक येऊ लागला विचित्र आवाज; आत डोकावताच फुटला घाम

व्यक्तीने घातलेल्या शर्टाच्या आत असं काही सापडलं की सर्वांची हवा टाइट झाली.

जाहिरात

शर्टात साप (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जुलै :  तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेलात. तिथं एखाद्या शेतात किंवा एखाद्या झाडाखाली खायला बसलात. तिथंच झाडाच्या सावलीत आराम करत आहात आणि अचानक तुम्ही घातलेल्या कपड्यांच्या आतून तुम्हाला आवाज येऊ लागला तर… असंच एका व्यक्तीसोबत घडलं. या व्यक्तीने आपल्या कपड्यांच्या आत डोकावून पाहताच मोठा धक्का बसला. या व्यक्तीच्या शर्टाच्या आत चक्क साप होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सामान्यपणे साप जमिनीवर बिळात राहतात. पण ते झाड, दगडं, पाणी अशा ठिकाणीही आढळून येतात. अगदी घरात घुसून छप्पर, किचन, टॉयलेटमध्ये साप लपून बसलेले असतात. अशी काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. सापाचे असे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सापाचा सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका व्यक्तीच्या शर्टाच्या आत साप घुसला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती बसलेली दिसते आहे. तिच्या शर्टाच्या आतून आवाजही ऐकू येतो आहे. सुरुवातीला तिच्या शर्टाच्या बटणांकडे पाहा तिथं एक सापाचं डोकं दिसतं. साप शर्टाच्या बटणांच्या मध्ये असलेल्या जागेतून बाहेर डोकावताना दिसतो. त्या व्यक्तीच्या मदतीसाठी काही लोक आले आहेत. जसा साप लोकांना पाहतो तसा तो पुन्हा त्या व्यक्तीच्या शर्टाच्या आत जातो. बाप रे बाप! हा तर सापांचा बाप; VIRAL VIDEO पाहून उडेल थरकाप ती व्यक्ती शर्टाची बटणं उघडण्याचा प्रयत्न करते. दुसरी व्यक्ती तिला रोखते आणि ती त्या व्यक्तीच्या शर्टाची बटणं हळूहळू उघडते. व्हिडीओत तुम्ही पाहाल तर सापाने स्वतःला त्या व्यक्तीच्या कमरेभोवती, पोटाभोवती गुंडाळून घेतलं आहे. हळूहळू करून सापाची शेपटी आणि त्याचा इतर भाग बाहेर येतो. साप थोडा बाहेर आल्यावर ती व्यक्ती हलते. तसं त्या सापाचं तोंडही बाहेर येतं. साप पूर्ण बाहेर आल्यावर त्याला पाहाल तर तुम्हाला धडकीच भरेल. अगदी काळकुट्ट आणि लांबलचक असा हा साप आहे.

संबंधित बातम्या

हा साप व्यक्तीच्या शर्टात कधी आणि कसा घुसला ते या व्यक्तीलाही माहिती नाही. व्यक्तीने सांगितल्यानुसार ती झाडाखाली सावलीत आराम करत होती. VIDEO: तरुणीच्या गालापर्यंत पोहोचला साप; घाबरण्याऐवजी त्यालाच KISS करत बसली अन्… ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडीओत पाहिल्यावर सर्व जण घाबरले आहेत. एका युझरने ही व्यक्ती जिवंत राहिली कशी, आपण तर हार्ट अटॅकनेच गेलो असतो, असं म्हटलं आहे. काही युझर्सनी हा गारूडी असून त्याने कपडे बदलून फक्त असा स्टंट केल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावर काय वाटलं, आपली प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या