नवी दिल्ली 25 जुलै :प्रेम ही भावना खूप खास असते, असं म्हणतात. यात एकमेकांपासून क्षणभरही दूर राहावत नाही. प्रेम कधीही आणि कोणावरही होऊ शकतं. यापूर्वी तुम्ही अनेक अशी प्रकरणं पाहिली असतील, ज्यात प्रेमात जोडप्याने जात धर्माची भिंत ओलांडली. इतकंच काय तर दोन तरुण किंवा दोघी तरुणीच एकमेकींवर प्रेम करत असल्याच्या घटनाही समोर आल्या.. मात्र आता समोर आलेली कहाणी काही वेगळीच आहे. आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, त्यामध्ये एक तरुणी माणसाच्या नव्हे तर सापाच्या प्रेमात पडलेली दिसते. ती तिच्या पाळीव सापाच्या प्रेमात वेडी झाली आहे. मुलीच्या गळ्यात साप पाहून सर्वजण हैराण झाले. पण तरुणीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ती अगदी आरामात बसली होती. तरुणीच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी हसू उमटलं. ती सतत सापाला किस करत होती. शिवाय ती त्याच्यासोबत अगदी आरामात झोपली होती. मुलीने स्वतः याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
या व्हिडिओमध्ये एक मुलगी सोफ्यावर सापासोबत पडलेली दिसत आहे. तिच्या गळ्यात साप गुंडाळलेला होता. मुलीच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नव्हती. ती सापाशी अगदी आरामात खेळत होती. तसंच ती त्याला सतत किस करत होती. मुलगी जेव्हा सापाचं चुंबन घेते तेव्हा सापही तिच्यावर प्रेम व्यक्त करतो. शेवटी सापाने आपला चेहरा मुलीच्या चेहऱ्यावर ठेवला. हे पाहून मुलगी भावुक झाली. Viral Video: काय सांगता! माणूस चालू लागला की थांबते आणि थांबला का वाहू लागते ही नदी? एकदा पाहाच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच तो व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं, की हे खूप धोकादायक आहे. सापासारखा प्राणी कधीच पाळीव प्राणी असू शकत नाही. एकतर तो मुलीच्या गळ्याला स्वतःच्या शरीराने फास बांधून तिचा जीव घेऊ शकतो किंवा तिला चावू शकतो. त्याचवेळी एका यूजरने लिहिलं की, ही मुलगी तिच्या एक्ससोबत काय करत आहे?