नवी दिल्ली, 08 जुलै : साप म्हणताच अनेकांना घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, ज्यांच्यासाठी साप म्हणजे खेळणं. सापासोबत खेळताना, सापाला अंगावर खेळवताना अशा काही लोकांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सोशल मीडियावर असे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक शॉकिंग व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यात एका व्यक्तीने एक नव्हे तर अनेक साप गळ्यात लटकवले आहेत. महादेवाच्या गळ्यात तुम्ही सापाला पाहिलं आहे. पण काही माणसंही सापाला गळ्यात घेण्याचा धोका पत्करतात. अशीच ही व्यक्ती जिने सापाला आपल्या गळ्यात गुंडाळलं आहे. धक्कादायक म्हणजे हा फक्त एक साप नाही. तर मोजताही येत नाही, इतके साप त्याच्या गळ्यात आहे. OMG! ही कसली जत्रा? अंगावर लटकतात डझनभर साप हे साप त्या व्यक्तीच्या गळ्यात आपसामध्ये अडकले आहेत. त्यामुळे ते नेमके किती हे मोजणंही कठीण. त्याच्या मानेवरील काही साप खालीही पडत आहेत. त्याच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. जे हा साप त्या व्यक्तीच्या मानेतून खाली पडल्यावर हातांनी जमिनीवरून उचलतात आणि पुन्हा त्याच्या गळ्यात ठेवतात. व्यक्तीच्या मानेवर इतके साप पाहून आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. तुमचीही तीच अवस्था झाली असेल. पण जी व्यक्ती हे प्रत्यक्षात करत आहे, तिच्या चेहऱ्यावर मात्र किंचितशीही भीती दिसत नाही आहे. अगदी छाती ताणून तो बिनधास्तपणे चालतो आहे. ‘काहीच करणार नाही…’, म्हणताच गळ्यात लटकवलेल्या सापाने मानेलाच घेतला चावा; भयंकर LIVE VIDEO @Ankitprabha11 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी असे दृश्य पाहायला मिळत असल्याचं या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आङे. या दिवशी नाग देवतेची पूजा करण्याबरोबरच लोक विषारी सापांसह जुगलबंदी देखील करतात.
Happy nagpanchami 🐍🐍 pic.twitter.com/P0MSKDN14e
— Bharat ka sher 🦁 (@TruePerthh) July 7, 2023
काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक-दोन नव्हे तर किती तरी लोक साप घेऊन जाताना दिसते. सापाला कुणी हातात धरलेलं तर कुणी गळ्यात अडकवलं होतं. मोठी माणसंच नव्हे तर अगदी लहान मुलंही या जमावात दिसली होती. जणू साप पकडणाऱ्यांची पदयात्राच असावी असंच हा व्हिडीओ पाहून वाटलं होतं.