टॉयलेटचा धक्कादायक व्हिडीओ
मुंबई, 25 मे : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ. जो पाहिल्यानंतर लोक आता टॉयलेटला जायला घाबरत आहेत. हा व्हिडीओ पाहून सर्वांना घाम पुटला आहे. या व्हिडीओत असं काही आहे की, पाहिल्यावर तुम्हालाही धडकी भरेल. एका टॉयलेटचा हा व्हिडीओ. ज्यात असं काही होतं की तुम्ही विचारही केला नसेल. जेव्हा लोकांनी हा व्हिडीओ पाहिला तेव्हा अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती टॉयलेटमध्ये आहे. तिला टॉयलेटमध्ये काहीतरी दिसलं आहे. तुम्ही नीट पाहाल तर टॉयलेट सीटच्या आत काहीतरी आहे. टॉयलेट सीटच्या बाजून चक्क एक साप आहे. हा साप टॉयलेटच्या सीटच्या आत असा लपून बसला की सहजासहजी दिसतही नव्हता. भुकेल्या व्यक्तीने कचाकचा चावला जिवंत साप; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं कसंबसं करून त्या व्यक्तीने त्या सापाची शेपटी आपल्या हातांनी धरली आणि त्याने शेपटी खेचून त्याला टॉयलेट सीटमधून बाहेर काढलं. त्यानंतर एका डब्यात बंद केलं. व्हिडीओ पाहिल्यानंतर यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अशा ठिकाणी साप असू शकतो, असा विचारही केला नव्हता अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर एकाने हा व्हिडीओ पाहिल्यावर आता आपली टॉयलेटमध्ये जाण्याची हिंमत होणार नाही, असं म्हटलं आहे. एका सापाची एंट्री अन् 16000 घरात एकाच वेळी असं काही घडलं की सर्वांची झोप उडाली स्नेक नवी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची काय अवस्था झाली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.