घरात साप घुसला, घराच्या एखाद्या कोपऱ्यात साप सापडला अशी किती तरी प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण तरी एखादा साप एका वेळी एकावरच भारी पडू शकतो.
2/ 6
तुम्हाला आश्चर्य वाटेल एकट्या सापाने 16000 घरांतील लोकांच्या घरात एकाच वेळी असं काही केलं आहे की सर्वांची झोप उडाली आहे. अमेरिकेतील हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
3/ 6
ऑस्टिन शहरात एका सबस्टेशनमध्ये साप घुसला, तो इलेक्ट्रीफाईड सर्किटच्या संपर्कात आला, ज्यामुळे विजेचा प्रवाह थांबला. यामुळे तब्बल 16 हजार घरांमधील वीज खंडित झाली.
4/ 6
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 16 मे रोजी दुपारी 1 वाजता आउटेज सुरू झाला आणि सुमारे 16,000 ग्राहक प्रभावित झाले. सापामुळे हजारो लोकांच्या घरातील बत्ती गुल झाली.
5/ 6
ऑस्टिन एनर्जीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की वन्यजीवांच्या हस्तक्षेपामुळे वीज निकामी होऊ शकते. आज एक साप आमच्या एका सबस्टेशनवर विद्युत सर्किटच्या संपर्कात आल्यामुळे विजेचा प्रवाह थांबला. दु. 2 वाजेपर्यंत वीज पूर्ववत करण्यात आली.
6/ 6
ऑस्टिन एनर्जीचे प्रवक्ते मॅट मिशेल म्हणाले की, कंपनी आता अशा प्राण्यांना विजेपासून दूर ठेवण्यासाठी सबस्टेशनभोवती लो-व्होल्टेज इलेक्ट्रिक स्नेक फेन्सिंग बसवण्याच्या प्रक्रियेत आहे.(सर्व फोटो - प्रतीकात्मक)