JOIN US
मराठी बातम्या / Viral / Amazing! घरात शिरलेल्या सापाची तहान भागवली, सर्पमित्राने पाजलं पाणी

Amazing! घरात शिरलेल्या सापाची तहान भागवली, सर्पमित्राने पाजलं पाणी

तामिळनाडूमधील कुड्डालोरमध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या भागात घरामध्ये घुसलेल्या सापाला एका सर्पमित्राने पकडलं. विशेष म्हणजे त्याने सापाला बाटलीने पाणी पाजलं आणि साप देखील अगदी व्यवस्थित पाणी पिताना दिसून येत होता. हे पाहणारे सर्वजणच आश्चर्यचकित झाले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 23 एप्रिल: तामिळनाडूमधील (Tamil Nadu) कुड्डालोरमध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या भागात घरामध्ये घुसलेल्या सापाला एका सर्पमित्राने पकडलं. विशेष म्हणजे त्याने सापाला बाटलीने पाणी पाजलं आणि साप देखील अगदी व्यवस्थित पाणी पिताना दिसून येत होता. हे पाहणारे सर्वजणच आश्चर्यचकित झाले होते. सेल्वा असं या सर्पमित्राचं नाव आहे. तो या परिसरात कोणाच्या घरी साप, नाग आढळल्यास ताबडतोब तेथे जाऊन सापांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम करतो. त्या दिवशीही सेल्वाला माहिती मिळाली होती की, रिहाइशी वस्तीमध्ये एका घरात साप शिरला आहे. यावेळी त्याने घटनास्थळी पोहोचून सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला असं दिसून आलं की, साप कदाचित तहान लागल्याने व्याकूळ झाला आहे आणि त्यामुळे तो नेहमीपेक्षा वेगळ्या हरकती करत आहे. त्यानंतर सेल्वाने सापाची शेपूट पकडून त्याला बाटलीने पाणी पाजण्यात सुरुवात केली. सापदेखील न हालचाल करता अगदी शांतपणे पाणी पिताना दिसून आला. हा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्यानंतर त्याने सापाला पिशवीत घालून जंगलांमध्ये नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. सध्या उन्हाळा खूप वाढला असल्यामुळे तापलेल्या मातीपासून वाचण्यासाठी साप नागरी वस्तीत प्रवेश करत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. सिल्वाने रिहाइशी या भागात मागील पंधरा दिवसात जवळपास 50 सापांना पकडून जंगलामध्ये सुरक्षित सोडलं आहे.

संबंधित बातम्या

(वाचा -  लग्नानंतर झाली जन्मठेप; बाप होण्यासाठी आरोपीला मिळाला 15 दिवसांचा पॅरोल )

साप पाणी, दूध पितो का? याबाबत अनेक समज, गैरसमज आहेत. मात्र, छायाचित्रात साप पाणी पिताना दिसत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. दरम्यान, गेल्या फेब्रुवारी महिन्यात विहिरीत पडलेल्या नागाला पकडतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ IRS अधिकारी नवीन ट्रम्बू यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. सिमेंट काँक्रिटच्या विहिरीत पडलेल्या नागाला बाहेर येता येत नव्हतं. त्यावेळी तिघांनी मिळून नागाला पकडलं. यातील एकाने थेट विहिरीत उडी मारून नागाला दुसऱ्या मित्राकडील बाजूकडे हुसकावलं. ग्रीलला पकडून उभ्या असलेल्या एकाने अंत्यत चतुरपणे पाण्यात पोहणाऱ्या त्या नागाला पकडलं आणि वर उभ्या असलेल्या दुसऱ्या मित्राच्या हातात दिलं, अशा प्रकारे तिघांनी मिळून या नागाला विहीरीतून बाहेर काढलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या