खोडकर चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई, 10 जुलै : लहानमुलं कधी निरागस तर कधी खोडकर असतात. अशामुलांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले जातात जे लोकांना पाहायला देखील आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही. कारण इतकी लहान मुलं अशा गोष्टी देखील करु शकतात यावर विश्वास ठेवणं थोडं कठीणच. काही मुले नेहमी मजा करण्याच्या मूडमध्ये असतात. ते नेहमी घरी मजा करतात, शाळेतही मजा करायची संधी मिळाली तर ते मागे हटत नाहीत. अशाच एका खोडकर मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. VIDEO : ‘‘रेनकोर्ट कुठं आहे त्याचा?’’ पावसात भिजणाऱ्या बाप्पाला पाहून चिमुकलीचा निरागस प्रश्न हा व्हिडीओ शाळेतील मुलांचा आहे. जो एका लहान मुलाशी संबंधित आहे. यामध्ये खोडकर लहान मुलगा वर्गात बसून खूप हसत आहे. तेव्हाच शिक्षक येऊन त्याला उभे करतात आणि प्रश्न विचारायला सुरुवात करतात. शिक्षक त्याला विचारतात की पाचमधून पाच गेले किती उरले? तेव्हा या मुलाने जे उत्तर दिले ते पाहून कोणालाही हसू येईल. शिक्षकाने जेव्हा ‘पाचमधून पाच वजा केले तर किती उरतील?’ असं विचारताच मुलगा थेट उत्तर देतो, ‘मला माहित नाही.’ या लहान मुलानं थेट उत्तर येत नाही असं सांगण्याचं धाडस केलं. जे खरंतर सर्वांनाच जमत नाही. याची हद्द तर पुढे झाली जेव्हा शिक्षक त्याला तोच प्रश्न आणखी सोपा करुन विचारतात. कधी चिंपांझीला गाडी दुरुस्त करताना पाहिलंय? मालकाला मदत करताना Video Viral मुलाला समजावं म्हणून त्याला शिक्षक सांगतात की, ‘‘समज तुझ्याकडे पाच भटूरे असतील आणि मी ते पाचही घेतले तर तुझ्याकडे काय उरेल?’’ मग काय याचं उत्तर चिमुकल्याने जे काही दिलं आहे ते आणखीच मजेदार आहे. तो मुलगा उत्तर देतो छोले….. मुलाचे हे उत्तर ऐकून शिक्षकांसह संपूर्ण वर्ग हसला. इतकंच नाही तर हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही नक्कीच आपलं हसू आवरता येत नसणार. एका लहान मुलाशी संबंधित हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर हँडलवर ते शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘खूप मनोरंजक उत्तर मिळाले..’ काही सेकंदांच्या या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. नेटकरीतर या मुलाचे आणि त्याच्या शैलीचे फॅन झाले आहेत.