JOIN US
मराठी बातम्या / Viral / थोडसं खरचटलं म्हणून दुर्लक्ष केलं, नंतर मात्र जीवावर बेतलं, तरुणासोबत धक्कादायक प्रकार

थोडसं खरचटलं म्हणून दुर्लक्ष केलं, नंतर मात्र जीवावर बेतलं, तरुणासोबत धक्कादायक प्रकार

आईने जेव्हा त्या तरुणाला डॉक्टरांना भेटण्यास सांगितले असता त्याने नकार दिला. तो आईला म्हणाला- मला छोटीशी जखम आहे, ती स्वतःच बरी होईल.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जुलै : आपल्याला कुठेतरी ओरखडा आली किंवा किरकोळ दुखापत झाली, तर ती स्वतःच बरी होईल असे समजून आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण असंच करणं एका व्यक्तीला महागात पजलं. यामुळे त्याचा जीव जाताजाता वाचला.लडॉक्टरांनी सांगितले की, जर त्याने आणखी काही दिवस निष्काळजीपणा केला असता तर त्याचं जीव वाचवणं अशक्य झालं असतं. डेली मेलच्या वृत्तानुसार हे प्रकरण ब्रिटनचे आहे. सुतार म्हणून काम करणार्‍या जेमी कॉन्स्टेबल नावाच्या व्यक्तीच्या हाताला एक दुखापत झाली होती. खरंतर एक साधनामुळे या मुलाला खरचटलं होतं. आपल्या सर्वांप्रमाणेच हा २१ वर्षांचा तरुणही प्रत्येक वेळी दुर्लक्ष करतो. पण नोव्हेंबर 2022 मध्ये त्याच्या हाताला करवत लागली आणि त्याच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. आईने जेव्हा त्या तरुणाला डॉक्टरांना भेटण्यास सांगितले असता त्याने नकार दिला. तो आईला म्हणाला- मला छोटीशी जखम आहे, ती स्वतःच बरी होईल. ‘या’ किड्यांपासून तयार होतात लिपस्टिक्सच्या शेड्स, Peta नं दिली महत्वाची माहिती पण चार दिवसांनंतर जेमीची बहीण कॅथरीनच्या लक्षात आले की त्याला उलट्या होत आहेत. तसेच त्याची तब्येत देखील खराब झाली होती, एवढंच काय तर त्याला उठण्याची हिंम्मत देखील होत नव्हती. शिवाय त्याचा संपूर्ण हात सुजला होता. त्यानंतर जेमीला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी पाहिल्यानंतर त्याला तातडीने मोठ्या रुग्णालयात रेफर केले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, जेमीच्या हातात सेल्युलायटिसचा संसर्ग पसरला आहे. हा एक घातक जिवाणू संसर्ग आहे, जो सामान्य बॅक्टेरियामुळे होतो. हे जीवाणू आपल्या आणि आपल्या त्वचेवर नेहमीच असतात. जखम होताच ते आत शिरतात. तेथे हे आपल्या पेशी नष्ट करू लागतात. त्यामुळे असा प्रकार होतो. जॅमीला ताबडतोब शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, जर वेळेवर शस्त्रक्रिया झाली नाही तर येत्या काही तासांत हे विष संपूर्ण शरीरात पसरेल असते आणि जेमीला वाचवणे कठीण झाले असते. जेमी म्हणाला, जेव्हा मी कट पाहिला तेव्हा मला वाटले नाही की यात काही समस्या आहे, कारण ते खूपच लहान होते, परंतु आता त्या छोट्याशा दुखापतीमुळे मात्र मी जीवनमरणाच्या प्रवासातून परत आलो आहे. जेमीचा हात वाचवण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या हाताचं बोट कापलं तसेच त्याच्या मांडीवरील त्वचा काढून त्या जागेवर लावावी लागली. ज्यामुळे आता जेमी बरा तर झाला आहे. मात्र आता त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या