JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral : बैलापासून स्वत:ला वाचवण्यासाठी खांबावर चढली व्यक्ती आणि... धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Viral : बैलापासून स्वत:ला वाचवण्यासाठी खांबावर चढली व्यक्ती आणि... धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

बैलाला एका खांब्याला बांधलं आहे. त्यानंतर तो इतका चवताळला की जो जवळ दिसेल त्याला मारण्याचा तो प्रयत्न करत आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,5 मे : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे दिवसभरात असंख्य व्हिडीओ पडत असतात. तेही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यामध्ये कधी मनोरंजक, कधी आर्ट एन्ड क्राफ्ट, मेकअप, तर कधी कॉमेडी व्हिडीओ असतात. असे व्हिडीओ पाहायला लोकांना आवडतं, ज्यामुळे त्यांचं मनोरंजन देखील होतं. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, जो तुम्ही श्वास रोखून पाहाल. हा व्हिडीओ बैलाशा संबंधीत आहे. ज्यामध्ये बैलाला एका खांब्याला बांधलं आहे. त्यानंतर तो इतका चवताळला की जो जवळ दिसेल त्याला मारण्याचा तो प्रयत्न करत आहे. असं करतानाच त्याने खांब्याजवळ असलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती व्यक्ती खांब्यावर चढली. पण पुढे जे घडलं ते आणखी धक्कादायक आहे. इतक्या मोठ्या बैलाला रागाने इकडे तिकडे धावताना पाहून कोणालाही धडकी भरेल. कारण त्याच्या एका धडकेमुळे कोणाचाही जीव जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार घडला, ज्यामध्ये एका वृद्ध महिलेनं प्राण गमावले आहे.   नक्की या व्हिडीओत काय घडलं? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला ग्रामीण भागाचे दृश्य दिसत आहे. रस्त्यावर एक भयंकर बैल दिसतो. त्याचवेळी समोर काही लोकही दिसतात. बैलाला बांधायला गेलेली व्यक्ती त्याला पाहताच खांबावर चढते. काही लोक घटनास्थळावरून इकडे तिकडे धावू लागले. सुदैवाने बैल खांबाला बांधला होता, अन्यथा त्याने नक्कीच कोणाला तरी जखमी केलं असतं.

संबंधित बातम्या

हा बैल आधी त्या खांब्यावरील व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा त्याला ते शक्य होत नाही तेव्हा बैल तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण असं असलं तरी देखील बैलाला खांब्याला बांधलं असल्यामुळे त्याला तेथून कुठेही जाता येत नाही. पण यामुळे खांब्यावर चढलेली व्यक्ती तिथेच अडकली आहे. बैलाला मारण्याची दुर्बुद्धी सुचली आणि दोरीत फसला तरुण, पाहा व्हिडीओ बैलाला खांब्याला बांधलेला असल्याने बैल पळून जाऊ शकत नाही. तर दुसरीकडे ती खांबावरून खाली उतरताही येत नाही. अशी विचित्र परिस्थिती पाहायला मिळते. हा व्हिडीओ कुठल्यातरी ठिकाणचा आहे, हे कळू शकलेलं नाही पण हा व्हिडीओ kuttykalaivanan नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याला लाखोवेळा पाहिलं गेलं आहे. तर अनेक लोकांनी यावर भरभरुन कमेंट्स देखील केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या