मुंबई : सोशल मीडियाचं जग हे माहितंचं जग तर आहेत, शिवाय येथे तुम्हाला अनेक मनोरंजक गोष्टी देखील पाहायला मिळतात. तसेच काही गोष्टी आपल्यासमोर उदाहरण म्हणून देखील येतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. जो पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. असं म्हणता की जेव्हा तुम्ही चांगली कर्म करता, तेव्हा तुम्हाला त्याचं फळ देखील नक्की मिळतं, तसेच जेव्हा तुम्ही वाईट काम करता तेव्हा देखील तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. एका तरुणासोबत देखील असंच घडलं, एवढंच काय तर त्याला त्याच्या वाईट कर्माचे फळ पुढच्याच क्षणी मिळालं. रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे व्यक्तीला पडले महागात, Video पाहून बसेल धक्का खरंतर लोकांच्या गर्दी एक बैल गर्दीच्या रस्त्यावर धावत आहे. त्यामुळेच विनाकारण त्याच गर्दीतून एक व्यक्ती बाहेर पडून बैलाच्या पाठीवर हाताने मारते. त्यामुळे बैल आणखी वेगाने धावू लागतो. पण पुढच्याच क्षणी या व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ मिळतं.
या तरुणाच्या पायात त्या बैलाच्या गळ्यात असलेली दोरी अडकते, ज्यामुळे तो पडतो. तो नुसताच पडत नाही, तर तो ज्या पद्धतीने पडतो, ते पाहून तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकेल.
“गौरंग भारद्वा1” आयडी असलेले प्रोफेसर एनजीएल राजा बाबू यांनी ट्विटरवर “झटपट कर्म” या कॅप्शनसह व्हिडीओ पोस्ट केला आहे. सुमारे 58 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि लाईक केला आहे. अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर कमेंट्स देखील केल्या आहेत.