जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दोन बैलांच्या भांडणात महिलेचा मृत्यू, सीसीटीव्हीत कैद झाली हादरवणारी घटना

दोन बैलांच्या भांडणात महिलेचा मृत्यू, सीसीटीव्हीत कैद झाली हादरवणारी घटना

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की दोन बैल रस्त्यात भांडत आहेत. तेव्हा हे बैल बाजूच्या भिंतीवर जाऊन आढळतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी धडकी भरवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये मोकाट प्राण्यांमुळे महिलेला प्राण गमवावे लागले असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ छत्तीसगढमधील दुर्ग येथील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये दोन बैल भांडत असताना एका वृद्ध महिलेचे प्राण गेले. मासे पकडण्यासाठी चिमुकल्याचा अजब जुगाड, Video पाहून नेटकरी कौतुक करताना थकत नाहीत नक्की असं काय घडलं? व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की दोन बैल रस्त्यात भांडत आहेत. तेव्हा हे बैल बाजूच्या भिंतीवर जाऊन आढळतात. आधी काहीच लक्षात येत नाही पण जेव्हा दुसऱ्या कॅमेरातील दृश्य सुरु होतात, तेव्हा तुम्ही हे स्पष्ट पाहू शकता की हे दोन बैल भांडण करत, वृद्ध महिलेला जाऊन धडकतात.

खरंतर रस्त्याच्या कडेला एका कठाड्यावर काही वृद्ध मंडळी बसलेली असतात. तेव्हा बैल भांडत जवळ येतात हे पाहून सगळे लोक उठून पळू लागली. पण या वृद्ध महिलेला पटकन आत जाता आले नाही. ही महिला खोलीत जाण्यासाठी उठून उभी राहिली असता, बैलाने येऊन तिला गंभीर जखमी केलं.

News18लोकमत
News18लोकमत

घटनेच्या वेळी आसपास उपस्थित असलेल्या लोकांनी गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात नेली, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. शिव नगर डोंगिया बंधा तालाब पार येथील रहिवासी असलेल्या 80 वर्षीय रुख्मीनबाई साहू यांच्यासोबत ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो हे ऐकलं आहे, पण एखाद्याचा मृत्यू होणं हे खरोखर खूपच वाईट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात