बिबट्यावर सिंहाचा हल्ला
मुंबई : जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. कधी कुठून आपल्यावर कसा हल्ला होईल याचा मागमूसही नसतो. त्यामुळे प्रत्येक पावलावर सावध राहील नाही तर जीवानीशी जाण्यावाचून प्राण्यांकडे पर्याय नसतो. असाच बेसावपणे बिबट्या झोपला असताना त्याच्यावर सिंहाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. सिंह श्रेष्ठ की बिबट्या असा प्रश्न अनेकदा पडला असेल. असाच एक बिबट्या आणि सिंहाच्या लढाईचा व्हिडीओ समोर आला आहे. सिंहाने बिबट्याची कळ काढली आणि त्यामुळे बिबट्याने सिंहावर हल्ला केला. या दोघांच्या लढाईल मात्र बिबट्याला थोडं नमतं घ्यावं लागल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
तहानेने व्याकूळ होता जंगलाचा राजा सिंह, माणसाने हाताने पाणी पाजलं; VIDEO चा शेवट असा की…या व्हिडीओमध्ये दिसत आहे की बिबट्या निवांत झोपला आहे. तेव्हाच त्याच्या जवळ सिंह येतो. बिबट्याला काहीतरी घडणार याची चाहूल लागते बघतो तर सिंह डोळ्यासमोर असतो. तो पटकन आपलं संरक्षण करण्यासाठी त्याच्यावर हल्ला करुन आपला जीव वाचवण्यासाठी धडपडतो. सिंहही त्याच्यावर हल्ला करतो. या लढाईल अखेर बिबट्याला माघार घ्यावी लागते आणि आपली जागा सोडावी लागते. बिबट्या आणि सिंहामध्ये कधी शिकारीवरुन तर कधी जागेवरुनही वाद झाल्याचे या पूर्वी व्हिडीओ समोर आले होते.
इन्स्टा अकाउंट @discoverywildanimalnature98 या युजरने हा बिबट्या आणि सिंहाच्या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. व्हिडिओला 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जगातील सर्वात महाग गाय; किंमत वाचून बसेल धक्का, भारताशी खास कनेक्शनएकाने सांगितले की, नीट पाहिल्यानंतर सिंहाच्या हल्ल्याआधी बिबट्याने डोळे उघडले होते, अशी माहिती मिळत आहे. एकाने सांगितले की, बिबट्या लहान आहे, सिंहाशी लढण्याची हिम्मत नाही. एकाने सांगितले की, बिबट्या आणि सिंह एकाच ठिकाणी पाहणे हा एक अद्भुत अनुभव असेल. तर एकाने सांगितले की बिबट्या वाचला!