नवी दिल्ली, 01 जुलै : प्राण्यांवर प्रेम करा, प्राण्यांना खाऊ-पिऊ घाला, असं सांगितलं जातं. काही लोक पक्षी, प्राणी यांच्यासाठीही एखाद्या भांड्यात पाणी, खाणं ठेवतात. काही लोक स्वतःच्या हातानेच त्यांना भरवतात. मुक्या जीवासाठी इतकं जरी केला तरी त्याचं समाधान, आनंद वेगळाच असतो. पण तरी मुक्या जीवाला खाऊ-पिऊ घालावं म्हणून ते कुत्रा-मांजरांपुरता ठिक आहे पण तुम्ही कधी सिंहाला खाऊ-पिऊ घालायची हिंमत तरी कराल का? पण एका व्यक्तीने ते केलं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सिंह… जंगलाचा राजा. ज्याच्यासमोर येण्याची हिंमत भल्याभल्या प्राण्यांचीही होत नाही. असाच एक सिंह तहानेने व्याकूळ झाला होता. जंगलात तडफडत होता. भऱ उन्हात तो पाण्याच्या शोधात निघाला होता. त्याचवेळी एक माणूस आणि त्याच्या हातात त्याला पाण्याची बाटली दिसली. ती पाहताच सिंहाने माणसाच्या दिशेने धावत घेतली. त्यानंतर जे घडलं ते थक्क करणारं आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक सिंह एका झाडामागून धावत येतो कारण त्याला एक माणूस दिसतो. आता माणूस दिसताच सिंह धावत येणं म्हणजे तो शिकार, हल्ला करण्यासाठीच. पण इथं मात्र वेगळंच दृश्य दिसलं. सिंह धावत आला तो शिकारीसाठी नव्हेत, त्यांना माणसाजवळ येऊन त्याच्यावरही हल्लाही केला नाही. उलट माणसाने या सिंहाला आपल्या हातांनी पाणी पाजलं आहे. शाब्बास गड्या! गोमातेला वाचवण्यासाठी बळीराजा जंगलाच्या राजाशी भिडला; थरारक VIDEO सिंह तहानेने व्याकूळ झाला होता. खूप तहान लागलेली असताना त्याला एका माणसाच्या हातात पाण्याची बाटली दिसली आणि तेच पाणी पिण्यासाठी म्हणून तो धावत आला. त्या व्यक्तीनेही आपल्या हातातील पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडलं आणि बाटली सिंहाच्या तोंडाला लावली. सिंहाला तसं बाटलीने नीट पाणी पिता येत नव्हतं म्हणून व्यक्ती आपला हात सिंहाच्या तोंडाजवळ धरला. बाटलीतील पाणी हातात ओतून त्याने आपल्या हाताने सिंहाला पाणी पाजलं. खतरनाक सिंहही एखाद्या साध्या मांजराप्रमाणे शांतपणे गटागटा पाणी पिताना दिसतो आहे. इवल्याशा बदकामुळे खतरनाक वाघालाही फुटला घाम; हा VIDEO एकदा पाहाच सिंहाचे आजवर तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण असा व्हिडीओ कधीच पाहिला नसेल. किंबहुना असं दृश्य तुम्हाला पुन्हा पाहायलाही मिळणार नाही.
“If there is magic on this planet, it is contained in water.” pic.twitter.com/ORw4lZDr7L
— Susanta Nanda (@susantananda3) June 29, 2023
आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला. जगात कोणत्या गोष्टीत जादू असेल तर ती पाण्यात, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.