जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जगातील सर्वात महाग गाय; किंमत वाचून बसेल धक्का, भारताशी खास कनेक्शन

जगातील सर्वात महाग गाय; किंमत वाचून बसेल धक्का, भारताशी खास कनेक्शन

जगातील सर्वात महाग गाय

जगातील सर्वात महाग गाय

जगात असे अनेक पाळीव प्राणी आहेत ज्यांच्याविषयी वेगवेगळी मान्यता आहे. काहींची देवांशीही तुलना केली जाते. प्रत्येकाचं एक खास आणि वेगळं महत्त्व आहे. गायींना भारतात देव मानलं जातं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 जुलै : जगात असे अनेक पाळीव प्राणी आहेत ज्यांच्याविषयी वेगवेगळी मान्यता आहे. काहींची देवांशीही तुलना केली जाते. प्रत्येकाचं एक खास आणि वेगळं महत्त्व आहे. गायींना भारतात देव मानलं जातं. त्यामुळे लोक गायींचा आदर करत त्यांची पूजाही करतात. संपूर्ण जगभरात गायींच्या निरनिराळ्या प्रजाती त्यांच्याविषयी काही खास गोष्टी आहेत. एक अशीही गाय आहे जिची किंमत सर्वात जास्त आहे. जगातील सर्वात महाग काय म्हणून तिची ओळख आहे. ब्राझीलमधील एका गायीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. जिच्या किंमतीत तुम्ही गाडी, बंगलादेखील विकत घेऊ शकता. ही गाय नेल्लोर जातीची असून साडेचार वर्षांची आहे. याविषयी ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटनं वृत्त दिलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नेल्लोर जातीची साडेचार वर्षांची गाय व्हिएटिना-19 एफआयव्ही मारा इमोव्हिस ही जगातील सर्वात महाग गाय आहे. ब्राझीलमध्ये या प्रजातीच्या शेकडो गायी आढळतात. अहवालानुसार, गायीची एक तृतीयांश मालकी नुकतीच ब्राझीलमधील अरांडू येथील लिलावात 6.99 दशलक्ष रिअल म्हणजेच 11 कोटी रुपयांना विकली गेली, ज्यामुळे तिची एकूण किंमत 4.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 35 कोटी रुपये झाली. Viral Video : 40 फूट उंचीवरून पडला चिमुकला, धाडसी स्टंट आला जीवाशी Viatina-19 FIV Mara Imovys ला गेल्या वर्षी जगातील सर्वात महागड्या गायी म्हणून घोषित करण्यात आले. या जातीचे नाव आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील नेल्लोर जातीवरून पडले आहे. येथून ही जात ब्राझीलमध्ये पाठवण्यात आली आणि नंतर ती जगाच्या इतर भागातही पसरली. एकट्या ब्राझीलमध्ये या जातीच्या सुमारे 160 दशलक्ष गायी आहेत. या गायींकडे चमकदार पांढरी फर असते, त्यांची त्वचा सैल असते. नेल्लोर गायी उष्ण हवामानात सहस जुळवून घेतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात