सीमा हैदर डान्स व्हिडीओ
मुंबई, 18 जुलै : सीमा हैदर ही भारतीय महिला सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे. एक पाकिस्तानी महिला जी प्रेमासाठी आपला देशा आणि नवरा सोडून भारतात आली. भारतात पोहोचण्यासाठी तिने खूप कष्ट देखील घेतले असल्याचे बोलले जात आहे. सचिन आणि सीमाची पबजीमुळे ओळख झाली, त्यानंतर मैत्री आणि मग प्रेम…. अनेकांचं असं म्हणणं आहे की सीमा ही पाकिस्तानी स्पाय आहे जी भारतात घुरखोरी करु पाहात आहे. पण सीमा आणि सचिनचं असं म्हणणं आहे की ती प्रेमासाठी इतक्या लांब आली आहे. आश्चर्य म्हणजे सीमा आपल्या मुलांना घेऊन भारतात आली आहे. सीमा-सचिनच्या लव्ह स्टोरीमध्ये मोठा खुलासा, फक्त भाऊच नाही तर काकासुद्धा… या सर्वात सीमाचा आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, जो जोरदार व्हायरल देखील झाला आहे. ज्यामध्ये ती लाल साडी नेसून एका भारतीय गाण्यावर नाचत आहे आणि काही महिला तिच्यावर नोटांचा वर्षाव करत आहेत. सीमा लाल रंगाच्या साडीत अगदी भारतीय डान्स करताना दिसत आहे. तिला असं पाहून ती हिंदू किंवा भारतीय नाही यावर अनेकांना विश्वास ठेवणं देखील कठीण झालं आहे. तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे आणि आपल्या देशात परत जाण्यासाठी सांगत आहेत.
सीमाच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळया प्लॅटफॉर्म आणि अकाउंट वरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर अनेक लोकांनी कमेंट केला आहे आणि हजारो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. Viral Video : भिंतीवर अशा सरसर चढल्या चिमुकल्या पाहून म्हणाल, अरे.. या तर ‘Spider Girls’ सीमाने आता हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि तिला पाकिस्तानला परत जायचं नसल्याचं ती सांगते आता मी मरेन तर सचिनसोबतच असं सीमाचं म्हणणं आहे. सीमा बेकायदेशीरपणे भारतात असल्याबद्दल पोलिसांनी अटक केली होती, परंतु उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्यांना जामीन मंजूर केला. 4 जुलै रोजी, सचिन आणि सीमा या दोघांनी मीडिया आणि पोलिसांसमोर एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले आणि त्यांना भारतात लग्न करण्याची आणि एकत्र राहण्याची परवानगी देण्याची विनंती सरकारला केली.