मुंबई, 18 जुलै : सोशल मीडियावर व्हिडीओची कमी अजीबात नाही. इथे तुम्हाला जे व्हिडीओ पाहायला आवडतील असे सगळेच व्हिडीओ पाहायला मिळतील. मग ते थरारक अपघाताचे असोत किंवा मग मनोरंजक व्हिडीओ. इथे अगदी लहान मुलांपासून ते प्राण्यांपर्यंत सगळेच व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जो खूपच मजेदार आहे. हा व्हिडीओ काही लहान मुलींचे आहेत. ज्या असा काही प्रकार करत आहेत की पाहून तुम्हाला नक्कीच वाटेल आश्चर्य आणि त्यांच्या कृतीवर हसू देखील येईल. Viral Video : “पाचमधून पाच वजा केले तर किती उरले?” या खोडकर मुलाचं उत्तर ऐकाल तर पोट धरुन हसाल या व्हिडीओची सुरुवात एका चीनी चिमुकलीपासून होते. जी फक्त आपले हात आणि पायांच्या सह्याने भिंतीवर जाऊन उभी राहिली आहे. पुढे आणखी एक चिमुकली आपल्या घरातील बीमला लटकून वर चढताना तुम्हाला दिसेल. शिवाय या व्हिडीओत आणखी एक चिमुकली दिसते जी अगदी खाद्या पाली सारखी खांबाला पकडून वर जाताना दिसते. तुम्ही झुरळा, पाल, मुंग्या इत्यादी किटक किंवा प्राणी भिंतीवर चढताना पाहिले असेल. पण एखाद्या माणसाला असं करता येणं अशक्य आहे. पण या मुली मात्र ते आरामात करत आहेत.
OMG Newton would be proud of her! 💕😂pic.twitter.com/O15qb8kxlx
— Figen (@TheFigen_) July 16, 2023
हा व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या अकाउंटवरुन ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, “अरे देवा! न्युटनला देखील यांच्यावर गर्व होईल.” हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की तो 40 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. शिवाय या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओला आपल्या मित्रांसोबत देखील शेअर केलं आहे.