मराठी बातम्या / बातम्या / Viral / उर्फीला टफ फाइट; मेट्रोत तरुणीच्या अवताराने सर्वच अवाक्, Video व्हायरल

उर्फीला टफ फाइट; मेट्रोत तरुणीच्या अवताराने सर्वच अवाक्, Video व्हायरल

व्हायरल

आपल्या अतरंगी फॅशनमुळे कायम चर्चेत असणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या निरनिराळ्या फॅशनने सर्वांना थक्क करते.


नवी दिल्ली, 2 एप्रिल : आपल्या अतरंगी फॅशनमुळे कायम चर्चेत असणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या निरनिराळ्या फॅशनने सर्वांना थक्क करते. आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टींपासून उर्फी कपडे बनवते. उर्फीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून अनेकजण तिला फॉलोही करतात. आत्तापर्यंत अनेकजण उर्फीची फॅशन फॉलो करताना दिसून आले आहेत. सध्या मेट्रोमधील एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक तरुणीने उर्फीला फॉलो केल्याचं दिसून आलं. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता, मेट्रोमध्ये काही तरुणी बसलेल्या२ दिसत आहेत. त्यातली एक तरुणी स्टेशन आल्यावर उतरण्यासाठी उठते. मात्र तिची फॅशन पाहून उर्फीचीच आठवण येते. तिचा फॅशन सेन्स, ड्रेसिंग स्टाईल अगदी उर्फीसारखीच असल्याचं पहायला मिळत आहे.

Delhi Metro मधून बिकिनीत प्रवास करणारी मुलगी अखेर समोर, व्हायरल व्हिडीओवर म्हणाली...

या मुलीच्या ड्रेसिंग स्टाइलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'नाही, ती उर्फी नाही...'

तरुणीने स्‍लिट मिनी स्‍कर्ट आणि ट्रेंडी ब्रा घातली आहे. तिचा ड्रेसिंग पाहून मेट्रोमधील बाकी तरुणी अस्वस्थ दिसून येत आहेत. या व्हिडीओवर सध्या खूप कमेंट येत असून अनेकांना तर या तरणीला पाहून उर्फी जावेदचीच आठवण आली आहे. व्हिडीओवर अनेक निरनिराळ्या कमेंट पहायला मिळतायेत. अनेकांनी उर्फी जावेदची कॉपी केल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, बिग बॉस ओटीटीसह प्रसिद्धी मिळवल्यानंतर उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन आणि बोल्ड ड्रेसिंग स्टाइलने इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. ती कधी काय घालेल काही सांगता येत नाही. त्यामुळे ती नेहमीच सर्वांना आपल्या फॅशनने आश्चर्यकारक करते.

First published: April 02, 2023, 15:56 IST
top videos
  • Kolhapur News : घरातील शुभकार्याचे निमित्त साधून 'इथं' लावली जातात झाडे, वाढदिवस देखील केला जातो साजरा, Video
  • Pune News : दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनो ॲडमिशनसाठी लगबग सुरू आहे? मग ‘या’ शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायला विसरू नका!
  • Pune News : पुण्याच्या लेकीची NDA मध्ये दमदार एन्ट्री, संपूर्ण देशात आली तिसरी, Video
  • Mumbai News : Rasika Sunil करणार Diet लग्न, मुहूर्तही ठरला! पाहा काय आहे प्रकार Video
  • Chhatrapati Sambhaji Nagar News : 15 वर्षांच्या मुलीने उभारली पुस्तकांसाठी मोठी चळवळ, संपूर्ण शहरात उभारलं नेटवर्क, Video
  • Tags:Metro, Social media viral, Top trending, Viral, Viral videos

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स