दिल्ली : उर्फी जावेद हे नाव आता सगळ्यांच्याच ओळखीचं झालं आहे. उर्फी तिच्या कपड्यांच्या एक्सप्रिमेंटमुळे ओळखली जाते. कोणी याला विचित्र स्टाईल म्हणतं, तर कोणी काय… अनेक लोक उर्फील ट्रोल करतात. पण असं असलं तरी अनेकांना उर्फीची ही हटके स्टाईल आवडते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उर्फीच्या या स्टाइलचं कौतुक केलं आहे. तसेच काही प्रसिद्ध डिझायनरने देखील उर्फीसोबत काम करण्याची तयारी दाखवली आहे. उर्फी जावेदच्या या विचित्र स्टाईलाच लोकांना स्वीकारायला वेळ लागत आहेत. तोच काही दिवसांपूर्वी आणखी एक उर्फी जावेद दिल्ली मेट्रोमध्ये दिसली. अर्थात ही मुलगी उर्फी जावेद नाही. पण तिच्या विचित्र कपडे घालण्याच्या स्टाईलमुळे लोक या तरुणीला दुसरी उर्फी जावेद म्हणू लागले आहेत. तसेच तिने उर्फीची कॉपी केली असं देखील लोक म्हणत आहेत.
उर्फीला टफ फाइट; मेट्रोत तरुणीच्या अवताराने सर्वच अवाक्, Video व्हायरल
ही तरुणी दिल्ली मेट्रोमध्ये विचित्र कपडे घालून फिरत होती. तेव्हा कोणीतरी तिचा व्हिडीओ काढला. त्यानंतर या तरुणीची चांगलीच चर्चा रंगली आहे आणि लोक आता या नवीन उर्फीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रिदम चनाना असे या मुलीचे नाव आहे. तिने व्हायरल झाल्यानंतर तिच्या कपड्यांबद्दल आणि उर्फी जावेदवर आपलं वक्तव्य केलं आहे. ही तरुणी म्हणाली, “मी काय घालायचे ते निवडण्याचं स्वतंत्र मला आहे. मी कोणत्याही पब्लिसिटी स्टंटसाठी हे केलेले नाही. लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याची मला पर्वा नाही. "
व्हायरल फोटो
पुढे जेव्हा या तरुणीला उर्फी जावेदपासून तुम्ही प्रेरित आहात का, असे विचारले असता. ती म्हणाले की, ‘‘मी उर्फीपासून प्रेरित नाही. उर्फी जावेद कोण आहे हे मला माहित नाही. अलीकडेच एका मित्राने तिचा फोटो दाखवला आहे. मात्र, उर्फीबद्दल कळल्यानंतर मी तिला पाहण्यास सुरुवात केली आहे.’’ तरुणी पुढे असेही सांगितले की, तिचे कुटुंबीय तिची निवड आणि तिच्या वागण्यावर खूप नाराज आहेत. शेजाऱ्यांकडूनही धमक्या येत असल्याचे त्याने सांगितले. तरीही लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही.
दरम्यान, हा तरुणीच्या कपड्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डीएमआरसीनेही एक निवेदन जारी केले आहे. DMRC म्हणते की प्रवाशांनी सामाजिक शिष्टाचार आणि प्रोटोकॉलचे पालन करावे अशी अपेक्षा आहे. मेट्रोमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी कोणताही पेहराव करू नये किंवा सहप्रवाशांच्या भावना दुखावतील असे वर्तन करू नये. डीएमआरसीच्या विधानावरही, तरुणीने ही चांगलेच उत्तर दिले आहे. ती पुढे म्हणाली की, “मेट्रोमध्ये व्हिडिओग्राफी न करण्याच्या नियमगाचा डीएमआरसीलाच विसर पडला आहे हे विचित्र आहे. जर डीएमआरसीला माझ्या पोशाखाची अडचण असेल, तर ज्या लोकांनी हा व्हिडीओ केला त्यांच्यावर का कारवाई केली नाही.” रिदम चनाना म्हणाली - माझ्यात जो बदल आला तो एका दिवसात आलेला नाही. मी पण एका रूढिवादी कुटुंबातील आहे जिथे मला माझ्या इच्छेनुसार माझे जीवन जगण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत मी एक दिवस ठरवलं की मला जे हवं ते करेन. मी या आधीही असाच प्रवास केला आहे.