स्कूल बस ड्रायव्हर अचानक बेशुद्ध
वॉशिंग्टन, 28 एप्रिल : ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हरचा अचानक नियंत्रण सुटणं, किंवा गाडी चालवताना ड्रायव्हरला हार्ट अटॅक येणं, ड्रायव्हर बेशुद्ध होणं, अशी काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात स्कूल बस चालवणारा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करताना अचानक बेशुद्ध झाला. पण सुदैवाने बसमधील ड्रायव्हरसह विद्यार्थ्यांना वाचवायला छोटा देवदूत धावून आला. स्कूल बसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीपासून बस ड्रायव्हर अस्वस्थ दिसत आहे. त्याला घाम येतो आहे. तो आपल्या डोक्यावरील टोपी काढून स्वतःला वारा घालताना दिसतो आहे. स्वतःला खूप सांभाळण्याचा प्रयत्न तो करतो पण शेवटी तो अचानक बेशुद्ध होतो.
ड्रायव्हर बेशुद्ध होताच गाडीवरील नियंत्रण सुटतं. गाडीतील सर्व मुलं आरडाओरडा करू लागतात. पण त्याचवेळी एक छोटा देवदूत सर्वांना वाचवायला धावून येतो. हा देवदूत दुसरा तिसरा कुणी नाही तर याच बसमधील विद्यार्थी आहे. जो वेळीच परिस्थिती हाताळतो. तो ड्रायव्हरच्या सीटजवळ जातो आणि गाडीचं नियंत्रण आपल्या हातात घेतो आणि गाडी थांबवतो. इतकंच नाही तर तो बसमध्ये घाबरलेल्या आपल्या इतर मित्रमैत्रिणींनाही शांत करताना दिसतो, इतर मुलांना तो धीर देतो. ट्रेन भरधाव वेगात आणि ड्राइव्हर मोबाईलमध्ये व्यस्त; पुढे भयंकर घडलं, पाहा LIVE VIDEO वॉरेन कन्सोलिडेटेड स्कूल्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. अमेरिकेतील ही घटना आहे. माहितीनुसार विद्यार्थी सातवीत शिकणारा आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा बसमध्ये जवळपास 66 विद्यार्थी होते, या सर्व विद्यार्थ्यांचा जीव या छोट्याशा मुलाने वाचवला आहे.
या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.