धक्कादायक व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 06 मे : आजची तरुणाई सोशल मीडियावर फारच एक्टिव असते. लोकांना सोशल मीडियावर फेमस व्हायला खूपच आवडते. फॉलोअर्स आणि व्हूज वाढवण्यासाठी काही तरुण मंडळी अगदी काहीही करण्याची तयारी दाखवतात. ज्यामध्ये ते धोकादायक स्टंट करायला देखील मागे पुढे पाहात नाही. स्टंट करताना अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे तुम्ही पाहिले असेल. तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याबद्दल जाणून तुमचा आत्मा हादरेल. हा व्हायरल व्हिडीओ हैदराबादमधील असल्याचे सांगितले जाते. या व्हिडीओमध्ये एक तरुण ट्रेनजवळ व्हिडीओ बनवत होता, तेव्हाच त्याच्यासोबत धोकादायक प्रकार घडला. या प्रकरणात आता पोलीस तपास करत आहेत. Viral : बैलापासून स्वत:ला वाचवण्यासाठी खांबावर चढली व्यक्ती आणि… धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद इंस्टाग्राम रील शूट करण्याच्या क्रेझमुळे हैदराबादमध्ये शुक्रवारी एका तरुणाचा वेगात येणाऱ्या ट्रेनमुळे मृत्यू झाला. मोहम्मद सरफराज असे या तरुणाचे नाव आहे. हा मुलगा फक्त 16 वर्षाचा आहे, जो इयत्ता नववीत शिकत होता. मोहम्मद सरफराज आपल्या दोन मित्रांसह सनत नगर रेल्वे स्टोशनजवळ त्याच्या इंस्टाग्राम रीलसाठी व्हिडिओ शूट करत होता. पण तेव्हाच तेथे ट्रेन आली आणि त्याचा मनोरंजक रिल्स त्याच्या स्वत:च्या मृत्यूचा व्हिडीओ बनला.
ही घटना घडली तेव्हा सर्फराजचे मित्र स्वत:ला वाचवण्यासाठी तेथून निघून गेले, मात्र सर्फराजला ट्रेनची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, तो शुक्रवारी सकाळी नमाज पडायला घराबाहेर पडला होता आणि काही तासांनंतर त्याचे दोन वर्गमित्र मुझम्मिल आणि सोहेल घरी आले आणि त्यांनी सर्फराज बेशुद्ध पडल्याचे सांगितले. Video Viral : गर्मीपासून वाचण्यासाठी व्यक्तीचा असा जुगाड, ज्यामुळे तो स्वत:चे गमवू शकतो प्राण ते घटनास्थळी पोहोचले असता त्यांचा मुलगा मृतावस्थेत पडलेला दिसला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोबाईल जप्त केला आहे. ज्यामध्ये या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.