मुलीचा धक्कादायक मृत्यू
तेलंगणा, 25 मे : गरमी इतकी वाढली आहे की सोसवत नाही. तापमान, ऊन यापासून बचावासाठी काय काय उपाय केले जात नाहीत. घराबाहेर पडताना टोपी, गॉगल, सनस्क्रिन अशा कितीतरी गोष्टी वापरल्या जातात. जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही. पण उन्हापासून बचावाचा असाच एक उपाय एका चिमुकलीच्या जीवावर बेतला आहे. एका मुलीच्या आईने तिला उन्हापासून वाचवण्यासाठी असं काही केलं की तिचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हैदराबादमधील ही धक्कादायक घटना आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. हयातनगर भागातील टीचर्स कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये घडलेला हा प्रकार. मृत मुलीचं कुटुंब नुकतंच नुकतंच कर्नाटकातून हैदराबादला आलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचे आईवडील मजूर आहेत. आपल्या दोन मुलांसह ते कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातून हैदराबादला उदरनिर्वाहासाठी आलं होतं. लग्नाआधी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन्…; नवरीसोबत भयंकर घडलं ज्या अपार्टमेंटमध्ये या मुलीचा मृत्यू झाला, त्याच्याजवळ एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. तिथं या मुलीची आई काम करत होती. लक्ष्मीला ऊन लागू नये, म्हणून दुपारी तिच्या आईने तिला या अपार्टमेंटच्या सावलीत आणलं आणि तिथंच झोपवलं. पण जिथं तिने मुलीला झोपवलं ती गाड्या पार्किंगची जागा होती. एक कार तिथं पार्किंगला आली आणि त्याखालीच ही चिमुकली चिरडली. कार ड्रायव्हरला जमिनीवर झोपलेली मुलगी दिसली नाही. पार्किंग करत असताना त्याची कार मुलीच्या अंगावर धावली. कुत्र्याला वाचवण्याच्या नादात स्वतः मृत्यूच्या दारात पोहोचला व्यक्ती; VIDEO चा शेवट भावुक करणारा बुधवारी हा वेदनादायक अपघात झाला आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे धक्कादायक दृश्य कैद झालं आहे.
हयातनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. .