मराठी बातम्या /बातम्या /Viral /कुत्र्याला वाचवण्याच्या नादात स्वतः मृत्यूच्या दारात पोहोचला व्यक्ती; VIDEO चा शेवट भावुक करणारा

कुत्र्याला वाचवण्याच्या नादात स्वतः मृत्यूच्या दारात पोहोचला व्यक्ती; VIDEO चा शेवट भावुक करणारा

कुत्र्याला वाचवण्याच्या नादात स्वतः मृत्यूच्या दारात पोहोचला

कुत्र्याला वाचवण्याच्या नादात स्वतः मृत्यूच्या दारात पोहोचला

पाणी खूप थंड होतं आणि कुत्र्याला त्यातून बाहेर पडणं अशक्य होतं. अशा स्थितीत त्याचा मृत्यू निश्चित होता, परंतु नंतर एक अज्ञात व्यक्ती तलावात उडी मारून कुत्र्याच्या मदतीसाठी पुढे सरसावला

नवी दिल्ली 25 मे : माणूस आणि प्राणी यांचं नातं खूप खास आहे. पण दोघांमध्ये खूप फरक आहे. प्राण्यांमध्ये कपटीपणाची भावना नसते. दुसरीकडे, एखादी व्यक्ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकदा काहीही काम करताना दिसते. मात्र, जगात असे अनेक लोक आहेत जे केवळ प्रेमापोटी प्राण्यांना मदत करतात, त्यामागे त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. आजकाल अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका कुत्र्याचा जीव वाचवताना दिसत आहे.

'गुड न्यूज मूव्हमेंट' या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा सकारात्मक व्हिडिओ पोस्ट केले जातात, जे लोकांना आयुष्यात चांगलं काम करण्याचा धडा देतात. नुकताच असाच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कुत्र्याचा जीव वाचवताना दिसत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील कोलोरॅडो येथील आहे. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याला पक्षी दिसला आणि तो त्याच्या मागे पळू लागला. यानंतर अचानक तो गोठलेल्या तलावावर धावू लागला.

उंटांच्या पाठीवरील कुबड्यात खरंच पाणी असतं का? काय आहे यामागील सत्य

काही अंतर गेल्यावर तो त्या तलावात अडकतो. पाणी खूप थंड होतं आणि कुत्र्याला त्यातून बाहेर पडणं अशक्य होतं. अशा स्थितीत त्याचा मृत्यू निश्चित होता, परंतु नंतर एक अज्ञात व्यक्ती तलावात उडी मारून कुत्र्याच्या मदतीसाठी पुढे सरसावला. त्या व्यक्तीचं नाव जेसन आहे. जेसननं सांगितलं की, त्याला माहित होतं की 2 मिनिटांत त्याला कुत्र्याला घेऊन बाहेर पडावं लागेल, अन्यथा दोघांचा जीव धोक्यात येऊ शकतो. कसा तरी तो त्याला बाहेर काढतो.

जेसनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो पाण्यातून बाहेर येताच सर्वजण त्याच्या मदतीला धावून येताना दिसतात आणि त्याचं जॅकेट काढतात. गुड न्यूज मूव्हमेंटवर शेअर केलेल्या व्हिडिओला जवळपास 19 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून जेसनचं कौतुक केलं आहे. एकाने म्हटलं की, त्या माणसाने देवासारखे कुत्र्याचे प्राण वाचवले. त्या व्यक्तीने आपल्या कृतीतून मानवतेचा आदर्श घालून दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Dog, Shocking video viral