पाटणा, 23 मे : लग्न म्हटलं की नवरीचं सजणं आलंच. यासाठी नवरी लग्नाआधी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काही ट्रिटमेंट घेतात. अशीच एक नवरी लग्नाआधी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. पण पार्लरमध्ये जाताच तिच्यासोबत भयंकर घडलं. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील ही धक्कादायक प्रकरण आहे. जे चर्चेत आलं आहे.
रविवारी संध्याकाळी उशिरा कासिम बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील कस्तुरबा वॉटर चौकात असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये एक तरुणी लग्नाआधी तयार होण्यासाठी आली होती. त्याचवेळी तरुण तिथं पोहोचला. त्याने या तरुणीवर अचानक गोळी झाडली. गोळीबारानंतर सर्वत्र गोंधळ उडाला. तरुणी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातं आहे.
IPL पाहण्याचा असाही फायदा! अपघातानंतरही बाईकस्वार बचावला; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
स्थानिकांच्या माहितीनुसार गोळीबाळानंतर त्याने स्वतःच्या डोक्यालाही बंदूक लावली पण ती खाली पडली. तेव्हा पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो तिथून पळून गेला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी पोलीस असून अमन कुमार असं त्याचं नाव आहे. इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार दुसरीकडे पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितलं की, अमन हा बिहार पोलिसांचा शिपाई असून तो सध्या पाटण्यात तैनात आहे. तो महेशपूर गावचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अमनला अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे.
दुसऱ्या लग्नानंतर बायकोचं असं सत्य समोर आलं की, नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली
आरोपीचे त्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. प्रेयसी दुसऱ्याशी लग्न करत असल्याने तो संतापला आणि रागाच्या भरात त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.