JOIN US
मराठी बातम्या / Viral / कोटींमध्ये पगार, राहायला आलिशान घर, तरीही याठिकाणी लोकांना नकोय नोकरी

कोटींमध्ये पगार, राहायला आलिशान घर, तरीही याठिकाणी लोकांना नकोय नोकरी

आपल्या देशातील बेरोजगारी आणि लोकसंख्येची परिस्थिती अशी आहे की, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी लोक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तयार होतील. कारण, सध्याच्या काळात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं फार कठीण ठरत आहे.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,16 फेब्रुवारी- आपल्या देशातील बेरोजगारी आणि लोकसंख्येची परिस्थिती अशी आहे की, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी लोक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तयार होतील. कारण, सध्याच्या काळात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं फार कठीण ठरत आहे. मात्र, जगात अशी काही ठिकाणं आहेत जिथे लोक एखादा कर्मचारी मिळवण्यासाठीदेखील तळमळत आहेत. चांगला पगार आणि राहण्यासाठी घराची सुविधा देऊनही तिथे जाण्यासाठी कोणीही तयार नाही. या नोकरीचं ठिकाण ऑस्ट्रेलियातील एका गावात आहे. तिथे एका डॉक्टरची गरज आहे. कोट्यवधी रुपये पगार देऊनही मिळेना कर्मचारी डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील क्विरेडिंग या गावामध्ये ही नोकरी आहे. या छोट्या गावात जनरल प्रॅक्टिसिंग डॉक्टरची गरज आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया प्रांतामध्ये असलेल्या या गावात एका डॉक्टरला चार कोटी 60 हजारांहून अधिक वार्षिक पगाराची नोकरी दिली जात आहे. यासोबतच त्याला राहण्यासाठी चार बेडरूमचं चांगलं घरही मिळेल. मात्र, तरीदेखील या ठिकाणी जाण्यासाठी कोणताही डॉक्टर तयार नाही. हे गाव ऑस्ट्रेलियाची राजधानी पर्थपासून 170 किलोमीटर अंतरावर आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून जनरल प्रॅक्टिशनरची कमतरता आहे. येथे 600 हून अधिक लोक राहतात. पण, त्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी एकही डॉक्टर किंवा मेडिकल स्टोअर गावामध्ये उपलब्ध नाही. (हे वाचा: तब्बल 5 हजार वर्षांपूर्वीच्या रेस्टॉरंट-पबचा लागला शोध; त्याठिकाणी घडतात थरारक घटना ) क्विरेडिंग हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील व्हीटबेल्ट प्रदेशात वसलेलं गाव आहे. या गावात एक लायब्ररी, कम्युनिटी सेंटर आणि अनेक लहान उद्यानं आहेत. एक सार्वजनिक स्विमिंग पूलदेखील आहे. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट आणि नेटबॉलसाठी ‘ग्रेटर स्पोर्ट्स ग्राउंड’ नावाचं मैदानदेखील आहे. इतर सुविधा तर आहेत फक्त दवाखान्यात डॉक्टरांची कमतरता आहे. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे नागरिक त्रस्त डॉक्टरांच्या कमतरतेमुळे या ठिकाणच्या इतर वैद्यकीय सुविधाही बंद पडल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील अनेक खेडेगावांची अशीच स्थिती आहे. गावकऱ्यांची गरज पाहून ऑस्ट्रेलियन सरकारनं गावांमध्ये जाऊन दोन वर्षे नोकरी करणाऱ्या डॉक्टरांना प्रति महिना सात लाख रुपये आणि पाच वर्षे राहणाऱ्या डॉक्टरांना 13 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही एकही डॉक्टर गावांमध्ये जायला तयार होत नाही. ऑस्ट्रेलियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, अशीच परिस्थिती राहिल्यास 2031 पर्यंत तिथे 11 हजार डॉक्टरांची कमतरता भासेल.जर, एखाद्या डॉक्टरला गावामध्ये जाऊन रुग्णसेवा करण्याची इच्छा असेल तर ऑस्ट्रेलियातील ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या