अखिलेश सोनकर (चित्रकूट), 11 एप्रिल : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा रात्रीच्या अंधारात एका मुलीवर घाईगडबडीत अंत्यसंस्कार झाल्याच्या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चित्रकूट जिल्ह्यात दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह यमुना नदीच्या काठावर संशयास्पद स्थितीत सापडला आहे.
तरुणीचे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा पोलीस दल आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा प्रकारे अल्पवयीन मुलीवर अंतिम संस्कार झाल्यानंतर लोकांना पुन्हा एकदा हातरसची घटना आठवली आहे. मात्र, हे प्रकरण परस्पर वादाचे असल्याचे बोलले जात आहे.
मळ पोलीस स्टेशन हद्दीतील यमुना रोड येथील राकेश त्रिपाठी यांची मुलगी स्नेहा (15) हिचा मृतदेह मागच्या दोन दिवसांपूर्वी(दि.11) सकाळी यमुना नदीत आढळून आला. याप्रकरणी मृताची आई राणी देवी आणि बहीण नेहा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. स्नेहाचा तिच्या मैत्रिणीसोबत पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता. यावरून स्नेहाचे आणि तिच्या मैत्रीणीचे भांडण झाले होते. यावर स्नेहा नाराज होती.
7 एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात स्नेहावर पहिल्यांदा प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोपी आणि तिच्या कुटुंबीयांनी हत्या केल्याचा संशयही नातेवाईकांनी व्यक्त केला होता. रविवारी रात्री डॉ. राजेश भारती, डॉ. शिवकुमार आणि डॉ. आकांक्षा यांच्या पॅनलने मृतदेहाचे शवविच्छेदन केले आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. यानंतर तरुणीचा मृतदेह गावी नेण्याऐवजी पोलिसांच्या बंदोबस्तात शहरातील स्मशानभूमीत नेण्यात आले. आणि रात्रीतून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यासंदर्भात मऊ पोलिस स्टेशनचे प्रभारी राजीव कुमार सिंह यांनी सांगितले की, मृतांच्या नातेवाईकांच्या संमतीनेच अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार स्नेहाचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला. विषारी द्रव्य व इतर आशंका यांची परिस्थिती स्पष्ट न झाल्याने मृताचा मृतदेह राखीव ठेवण्यात आला असून तपासासाठी पाठविण्यात आला आहे.