JOIN US
मराठी बातम्या / Viral / Real Tom & Jerry Video : इवलासा उंदीर मांजरावर भारी; पाहा रिअल 'टॉम अँड जेरी'ची जबरदस्त फाइट

Real Tom & Jerry Video : इवलासा उंदीर मांजरावर भारी; पाहा रिअल 'टॉम अँड जेरी'ची जबरदस्त फाइट

उंदीर आणि मांजराचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

रिअल टॉम अँड जेरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 मे : तुम्ही टॉम अँड जेरी कार्टुन पाहिलं असेलच. किंबहुना आजही तुम्ही ते कार्टुन पाहत असाल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं हे कार्टुन. ज्यात उंदीर आणि मांजराची मजेशीर फायटिंग पाहायला मिळते. तसं उंदीर आणि मांजर एकमेकांचे शत्रू हे तर आपल्याला माहिती आहेच. पण कार्टुनमध्ये दाखवल्याप्रमाणे खरंच प्रत्यक्षातही ते असंच भांडतात का? असा प्रश्न कधी ना कधी तरी तुम्हाला पडला असेल. हेच दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. कार्टुनमध्ये टॉम अँड जेरीची जी फाईट दाखवली जाते, तशीच रिअल लाइफमध्येही पाहायला मिळते. रिअल लाइफ टॉम अँड जेरीचा हा व्हिडीओ आहे. ज्यात उंदीर आणि मांजराची मजेशीर अशी फाईट तुम्ही पाहू शकता. इटुकला पिटुकला उंदीर त्याच्यापेक्षा मोठ्या मांजरावर चांगलाच भारी पडला आहे. उंदराने मांजराला चांगलाच धडा शिकवला आहे. बापरे बाप! घरात घुसला असा दुर्मिळ साप, मालकाची हवा टाईट; PHOTO पाहूनच डोळे पांढरे होतील व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मांजर उंदराला पकडण्यासाठी दबा धरून बसलं आहे. उंदीर रस्त्याच्या एका कोपऱ्यातून येतो आहे. जसा उंदीर मांजराजवळ येतं, तसं मांजर उंदराला पकडण्याचा प्रयत्न करतो.  उंदीरही मांजरापासून दूर पळून आपल्या जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. जसा मांजराचा स्पर्श होतो तसा उंदीर चिडतो. तो घाबरून पळून न जाता तसाच मागे फिरतो आणि मांजरावर धावून जातो. टुणटुण उड्या मारत तो मांजरावर हल्ला केल्यासारखं करतो आणि मांजराला घाबरवतो. इवल्याशा उंदराला मांजरही घाबरतं. उंदीर उड्या मारत आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे, हे दिसताच मांजर स्वतःचा काही पावलं मागे सरकतं. जसं मांजर मागे हटतं तसा उंदीर संधी साधून तिथून पळ काढतो. मांजर मात्र इतकं घाबरलं आहे की ते पुढे जाण्याची हिंमतच करत नाही. तिथंच बसून एकटक पाहत राहतं. अरेच्चा! सापही माणसांसारखं असं काही करतो? सापाचा आश्चर्यचकीत करणारा VIDEO @Figensport या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही किती लहान आहात हे महत्त्वाचं नाही, लढा द्या. असा संदेश या व्हिडीओच्या कॅप्शनमधून देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ पाहून अनेकांना टॉम अँड जेरीची आठवण झाली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या