जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरेच्चा! सापही माणसांसारखं असं काही करतो? सापाचा आश्चर्यचकीत करणारा VIDEO

अरेच्चा! सापही माणसांसारखं असं काही करतो? सापाचा आश्चर्यचकीत करणारा VIDEO

सापाचा दुर्मिळ व्हिडीओ.

सापाचा दुर्मिळ व्हिडीओ.

सापाचा अद्भुत आणि दुर्मिळ असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 03 मे : सापाचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. एखाद्या बाईकमध्ये, टॉयलेटमध्ये साप घुसल्याचं, सापाचं नृत्य, सापांचं मिलन असे एक ना दोन किती तरी व्हिडीओ आहेत. पण सध्या सापाचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो आजवर तुम्ही कधीच पाहिला नसेल. सापही माणसासारखं काहीतरी करताना दिसला. जे पाहून सर्व आश्चर्यचकीत झाले आहेत. सापाचा हा अद्भुत आणि दुर्मिळ असा व्हिडीओ. ज्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सापाने चक्क जांभई दिली आहे. शाळेत किंवा घरी अभ्यास करताना, ऑफिसमध्ये काम करताना किंवा अगदी बसल्या बसल्याही आपल्याला जांभई येते. अशीच जांभई एक सापही देताना दिसला.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. हिरव्या रंगाचा साप आहे. जो हळूहळू आपलं तोंड उघडतो. सुरुवातील वाटतं की त्याच्या समोर शिकार आहे आणि तो ती खाण्यासाठी आपलं तोंड उघडतो. पण पुढे काही वेगळंच दृश्य दिसतं. व्यक्तीने पाण्यात डुबकी मारली आणि समोर महाकाय अ‍ॅनाकोंडा; पुढचा थरार VIDEO मध्येच पाहा आधी तो आपलं तोंड पूर्ण उघडतो. त्यानंतर हळूहळू जबडा वाकडा करतो. जसं जांभई देताना कधी कधी आपलंही तोंड किंचितसं वाकडं होतं, अगदी तसंच या सापाचंही होतं. थोड्या वेळाने तो तोंड बंद करतं. तेव्हा समजतं की सापाने जांभई दिली आहे.

जाहिरात

ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. जांभई का येते? जांभई येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपण्यापूर्वी किंवा झोपेतून उठल्यानंतर आपण तोंड, शरीर वेडंवाकडं करून जांभई देतो. मात्र ही जांभई येण्‍याचं कारण काय?  एखाद्या वेळी अधिक थकतो, तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही जांभई भरून काढत असते, असं मानलं जातं. तर जांभई ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केला आहे. अभ्यासकांनी पोपटांवर याचं परीक्षण केलं होत. त्यांनी परीक्षणासाठी अतिशय उष्ण, कमी उष्ण आणि सामान्य वातावरण, अशा स्थळांची निवड करून प्रत्येक वातावरणात पोपटांना काही तास ठेवलं. कमी आणि सामान्य वातावरणातील पोपटांना जांभई आली नाही. मा‍त्र उष्ण वातावरणातील पोपटांना वारंवार जांभई येत असल्याचं निदर्शनास आलं. संशोधकांच्या मते, आपण जेव्हा सामान्य तापमानात असतो तेव्हा आपल्या मेंदू शांत राहतो. त्यामुळे आपल्याला जांभई येत नाही. त्याचप्रमाणे थंड वातावरणातही आपल्याला जांभई येत नाही. मात्र उष्ण वातावरणमध्ये आपला मेंदू तापत असल्याने आपल्याला जांभई येते. झोप येण्याआधी आणि झोपेतून उठल्यावर मेंदूला योग्य तापमानात आणण्यासाठी आपल्या जांभई येत असते. साधा साप समजून तरुणाने शेपटी खेचली आणि…, धक्कादायक शेवट; Shocking Video याशिवाय जास्त जांभई येण्यास काही समस्या किंवा आजारही कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात