उंदराची कुत्रा-मांजराशी फाइट (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 22 जून : टॉम अँड जेरी लहान मुलंच नव्हे तर मोठी माणसंही आवडीने पाहतात. उंदीर आणि मांजराची अशी फायटिंग कार्टुनप्रमाणे प्रत्यक्षातही पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पण यात एक ट्विस्ट आहेत. यात उंदरासमोर फक्त मांजरच नव्हे तर कुत्राही आहे. इवल्याशा उंदराने एकाच वेळी मांजर आणि कुत्रा दोघांशी जबरदस्त फाइट दिली आहे. टॉम अँड जेरीपेक्षाही भारी असा हा व्हिडीओ आहे. उंदीर, मांजर आणि कुत्र्याचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. उंदरी, मांजर आणि कुत्रा तसे एकमेकांचे शत्रू. मांजर उंदराच्या मागे असते तर कुत्रा मांजराच्या. पण या व्हिडीओत श्वान आणि मांजर एकत्र आले आहेत आणि त्यांच्यासमोर उंदीर एकटा आहे. आता इवलासा उंदीर त्याचं या दोन्ही मोठ्या प्राण्यांसमोर काय चालेल असंच तुम्ही म्हणाल. पण इटुकल्या पिटुकल्या उंदराने मात्र यांना चांगलीच टक्कर दिली आहे. गायींना फक्त पाहूनच खतरनाक वाघाचीही हवा टाईट, शिकार सोडून ठोकली धूम; Watch Video व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका कोपऱ्यात उंदीर आहे. एका बाजूने मांजर आणि दुसऱ्या बाजूने कुत्रा आहे. दोघंही त्या उंदरावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. उंदीर सुरुवातीला लपण्याचा, पळण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी तो दोघांनाही सामोरा जातो. मांजर आणि कुत्रा दोघंही उंदराला पकडण्याचा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. पण उंदीर मात्र दोघांच्याही तावडीत सापडत नाही. तो त्यांना इथून तिथे तिथून इथे असं पळवत राहतो. त्यांच्यापासून दूर पळण्याऐवीज त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना घाबरवतो. आश्चर्य म्हणजे मांजर आणि कुत्राही उंदराला घाबरतात. जसे ते त्या पकडायला पुढे येतात तसाच उंदीर त्यांच्यावर उडी मारायला जातो तेव्हा ते भीतीने मागे हटतात. बिनडोक्याचा डॉग पाहून सर्वांना धक्का! पण VIRAL PHOTO मागील सत्य काही औरच; तुम्ही सांगू शकाल का? @iamsallu33 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. धैर्याने संकटाचा सामना करणाऱ्या उंदराच्या हिमतीचं कौतुक केलं जातं आहे. तर अशा कुत्रा-मांजराना हाकलून लावा अशी कमेंट एका युझरने केली आहे.
तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.