भोपाळ, 20 जून : वाघ खतरनाक आणि गाय साधीभोळी… हे दोन प्राणी एकमेकांसमोर आले तर कोण कुणावर भारी ठरेल असं विचारलं तर साहजिकच कुणीही वाघच सांगेल. पण सध्या एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यात चक्क खतरनाक वाघ साध्याभोळ्या गायींना घाबरला आहे. गायीची शिकार करायला आलेला वाघ गायींना फक्त पाहूनच पळाला आहे. गायी समोर येताच त्याने आपला जीव मुठीत धरून धूम ठोकली आहे. गाय आणि वाघाच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वाघ गायींची शिकार करायला आला. पण शिकार न करताच तो तिथून गेला. जीव घ्यायला आलेल्या वाघावर स्वतःचा जीव वाचवण्याची वेळ आली. आता असं काहीतरी उलटं घडलं तर साहजिकच चर्चा होणारच. पण गायींना वाघ घाबरला, असं नेमकं काय घडलं. ते तुम्ही या व्हिडीओतच पाहा. साध्याभोळ्या गायीने उधळून लावला खतरनाक किंग कोब्राचा डाव; गोठ्यात येताच काय केलं पाहा VIRAL VIDEO व्हिडीओत पाहू शकता बऱ्याच गायी दिसत आहे. एक गाय मात्र सर्व गायींपासून दूर एका ठिकाणी निवांत बसली आहे. याच एकट्या गायीवर वाघाचा डोळा आहे. तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर समोरच्या दिशेने दबक्या पावलांनी हळूच एक वाघ येताना दिसतो. जसा तो गायीच्या जवळ येतो तसा तो पळत त्या गायीवर हल्ला करतो. गाय आपला जीव वाचवण्यासाठी ओरडते, आपल्या सहकाऱ्यांना बोलावते. आता सामान्यपणे वाघ म्हटला आणि त्याने कुणावर हल्ला केला की कुणीही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून त्याच्यापासून दूर पळेल. पण इथं मात्र वेगळं दृश्य दिसलं. एका गायीवर वाघाने हल्ला केल्यानंतर इतर गायी पळण्याऐवजी त्या वाघाच्या समोर गेल्या. आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी त्या वाघाला सामोऱ्या गेल्या. इतक्या गायींना एकत्र आलेलं पाहू वाघही बिथरला. त्याने त्या गायीला तिथंच सोडलं आणि तिथून पळाला. पिल्लाच्या मृत्यूनंतर आई हत्तीणीने असं काही केलं की, VIRAL VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी गायींनी आपलं एकीचं बळ दाखवून दिलं आहे. गायींच्या एकीच्या बळासमोर वाघाची ताकदही फेल ठरल्याचं या व्हिडीओत दिसून येतं.
मध्य प्रदेशच्या भोपाळमधील मदरबूल फार्ममधील ही घटना असल्याचं सांगितलं जातं आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं.