लोकांनी चक्क 12 अंड्यांना घेरून बसलेला महाकाय साप बघितला आणि गावात एकच खळबळ उडाली.
संजय यादव, प्रतिनिधी बाराबंकी, 8 जून : समोर एखादा लहानसा साप दिसला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यात अजगर पाहिला तर काही विचारायलाच नको. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी भागात लोकांनी चक्क 12 अंड्यांना घेरून बसलेला महाकाय साप बघितला आणि गावात एकच खळबळ उडाली. याबाबत बचाव पथकाला माहिती मिळताच त्यांनी अजगराला पकडलं आणि जंगलात सोडून दिलं त्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मनहोर गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीजण सकाळी शेतावर जायला निघाले होते. तेव्हा त्यांना वाटेत एका मोठ्या खड्ड्यात अंडी कवटाळून बसलेला साप दिसला. जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की हा महाकाय अजगर आहे. तेव्हा ते चांगलेच भेदरले आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला. काही वेळातच पूर्ण गाव तिथे गोळा झाला. गावात एकच खळबळ उडाली. लहान मुलांना आता या 12 अंड्यांमधून 12 साप बाहेर येणार की काय, अशी भीती वाटू लागली. गावकऱ्यांनी तातडीने याबाबत बचाव पथकाला माहिती दिली. Diljit Dosanjh: प्रसिद्ध अमेरिकन गायिकेला डेट करतोय पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ? ते ट्विट तुफान व्हायरल बचाव पथकाने थरारकपणे या अजगराला अंड्यांपासून वेगळं केलं आणि अंडीही सुखरुपरीत्या बाहेर काढली. अंडी आणि अजगर बचाव पथकाने जंगलात सुखरुपपणे सोडून दिली आणि गावकऱ्यांना आता तुम्हाला कोणताही धोका नाही, असं सांगितलं. तेव्हा कुठे गावकऱ्यांच्या जीवात जीव आला.