प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
वॉशिंग्टन, 08 फेब्रुवारी : कुणाला तीन-चार हात, कुणाला तीन-चार पाय, कुणाला दोन डोकं अशी बरीच माणसं तुम्ही पाहिली असतील. पण कधी कुणाच्या नाकावर प्रायव्हेट पार्ट आल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? तुम्हाला फक्त वाचूनच आश्चर्य वाटेल असं प्रत्यक्षात घडलं ते एका पुरुषासोबत. त्याच्या नाकावर प्रायव्हेट पार्ट आला आहे. अमेरिकेतील ही विचित्र घटना आहे. 58 वर्षांचा कॉनराडो एस्ट्राडा थॉमस रोमो. ज्याचा चेहरा पाहून सर्वजण हैराण होत होते. त्याला त्याचा चेहरा दाखवायलाही लाज वाट होती. बरेच लोक त्याच्याकडे पाहून हसत होते. कारण त्याचं नाक म्हणजे नाक नव्हे तर प्रायव्हेट पार्ट होतं. म्हणजे त्याच्या नाकाचा आकार हा प्रायव्हेट पार्टसारखा झाला होता. कॉनराडो म्हणाले, “माझं नाक तोंडापर्यंत पोहोचलं होतं. जेवताना नाक दाबावं लागत होतं. नाकाची लाज वाटत होती, म्हणून नेहमी मुखवटा घालत असे. लोक नाकाकडे टक लावून बघायचे आणि अनेकांनी चेष्टाही केली. प्रत्येकजण त्याची प्रायव्हेट पार्टशी तुलना करत असे” हे वाचा - कपलने दारू ढोसून वियाग्रा घेत केला रोमान्स; इतका जोश चढला की झाली भयंकर अवस्था द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, गेल्या 6 वर्षांपासून ते यावर उपाय शोधत होते. अखेर का डॉक्टरच्या घरी रंगकाम करण्यासाठी ते गेले, तेव्हा त्या डॉक्टरने त्या व्यक्तीचं नाक पाहिलं आणि तिला नेमकं काय झालं त्याचं निदान गेलं. डॉक्टरांनी सांगितले की त्याला rhinophyma आहे. ज्यामध्ये नाकाचे टोक जास्त लांब होते. त्यांनी त्या व्यक्तीवर उपचार करून त्यांना बरे करण्याचंही आश्वासन दिलं. त्यांनी त्याच्यावर मोफत उपचार केले. हे वाचा - व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वाजत होती ‘शिट्टी’; मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आलं धक्कादायक कारण डिसेंबर 2021 मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्याचा नाकाचा आकार कमी झाला. आता पुढील 50 वर्षे त्याला कोणत्याही नवीन उपचारांची गरज नाही.