जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वाजत होती 'शिट्टी'; मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आलं धक्कादायक कारण

व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वाजत होती 'शिट्टी'; मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आलं धक्कादायक कारण

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

सुरुवातीला व्यक्तीला आपल्या शरीरातून शिट्टीसारखा आवाज नेमका कुठून येतो आहे, ते समजेना. वैद्यकीय तपासणीत हा आवाज प्रायव्हेट पार्टमधून येत असल्याचं निदान झालं.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 30 जून : एका व्यक्तीच्या शरीरातून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येत होता. पण हा आवाज शरीराच्या नेमक्या कोणत्या भागातून येतो आहे, हे त्यालाही समजत नव्हतं. त्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याच शरीरही सूजलं. शेवटी त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. मेडिकल रिपोर्टमधून त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून हा आवाज येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्याचं कारणही शॉकिंग होतं (Whistle from man’s from private part). अमेरिकेच्या ओहियोत राहणारी 72 वर्षांच्या व्यक्ती. जिने श्वास घ्यायला त्रास होत असल्याने, शरीर सूजल्याने आणि शरीरातून शिट्टीसारखा आवाज येत असल्यानेआपली वैद्यकीय तपासणी करून घेतली. तिच्या छातीचं एक्स-रे काढण्यात आला. त्यामध्ये त्याच्या शरीरात भरपूर प्रमाणात हवा असल्याचं समजलं. त्यामुळे त्याचं फुफ्फुस आकुंचन पावत होतं. जर वेळीच उपचार केले नाही तर या व्यक्तीचं हृदय आणि फुफ्फुस कामातून गेलं असतं आणि त्याचा मृत्यू झाला झाला असता असं डॉक्टरांनी सांगितलं. हे वाचा -  DTH Dish Recharge संपताच बायकोने मागितला Divorce; नवऱ्याला म्हणाली, ‘TV नहीं तो बीवी नहीं’ त्यानंतर या व्यक्तीला त्याच्या शरीरातून येणाऱ्या विचित्र आवाजाचं नेमकं कारण समजलं. हा आवाज त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून येत होता. त्याचं स्क्रोटम म्हणजे अंडाशयाच्या डाव्या बाजूला झालेल्या जखमेतून हा आवाज येत होता. या व्यक्तीची 5 महिन्यांपूर्वी टेस्टिकल सर्जरी झाली होती, त्यामुळे ही जखम झाली होती. या जखमेतून हवा शरीरात भरली गेली आणि त्याचा परिणाम म्हणजे या व्यक्तीचं शरीर फुगलं आणि श्वास घेण्यात समस्या येऊ लागली. अमेरिकन जर्नल ऑफ केस रिपोर्ट मध्ये या प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली आहे. या व्यक्तीला  विस्लिंग स्क्रोटम असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आला. हे वाचा -  आजोबा-नातवाला चावला साप; रुग्णालयात नेताच असं काही घडलं की भीतीने रुग्णांसह कर्मचारीही पळाले या व्यक्तीच्या शरीरातील हवा काढण्यासाठी तिच्या छातीत दोन प्लॅस्टिक ट्युब लावण्यात आला. ही व्यक्ती रुग्णालयात तीन दिवस होती. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्याचं फुफ्फुस नीट झालं आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात