JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'शिवडे i am sorry'नंतर हे पोस्टर वेधतंय नागरिकांचं लक्ष, तरुणीला मिळाला प्रेमात धोका!

'शिवडे i am sorry'नंतर हे पोस्टर वेधतंय नागरिकांचं लक्ष, तरुणीला मिळाला प्रेमात धोका!

पुण्यातील ‘shivade i am sorry’चे पोस्टर तुम्हाला आठवत असतीलच. यानंतर आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. मात्र, यावेळी मुलानं नाही तर मुलीनं हे पोस्टर लावले आहेत.

जाहिरात

अटॅचमेंटच्या भावनेत ऑक्सिटोसिन हॉर्मोन वाढतात. ऑर्गेजममध्ये ऑक्सिटोसिनचा स्तर वाढतो. हेच एकमेकांबद्दल ओढ निर्माण करतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 10 फेब्रुवारी : शहरामध्ये किंवा चौकात वाढदिवस आणि नेत्यांचे बॅनर लावलेले आपण अनेकदा पाहातो. मात्र, मागील काही वर्षांपासून प्रेमी युगुलंही चौकांमध्ये एकमेकांसाठी पोस्टर (Poster) लावत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी सर्रास पाहायला मिळत आहे. पुण्यातील ‘shivade i am sorry’चे पोस्टर तुम्हाला आठवत असतीलच. या तरूणानं पुण्याच्या पिंपळे सौदागर परिसरात तब्बल 300 पोस्टर लावले होते. या पोस्टरची शहरात सगळीकडेच चर्चा रंगली होती. आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. मात्र, आता कोणत्या तरूणानं नाही तर एका मुलीनं हे पोस्टर लावले आहेत. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा खरंतर प्रेमवीरांसाठी अधिक खास असतो. याच कारण आहे, व्हॅलेंटाईन वीक(Valentine Day 2021) . या पूर्ण आठवड्यात प्रेमी युगुलं आपलं प्रेम एकमेकांजवळ व्यक्त करत असतात. मात्र, लखनऊच्या गोमतीनगरच्या चौकांमध्ये लागलेला एक पोस्टर सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधतं आहे. प्रेमात धोका मिळालेल्या एका युवतीनं आपल्या प्रियकराला बदनाम करण्यासाठी रस्त्यावरच पोस्टर लावला आहे. शहरात पाच ते सहा ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत. गोमती नगरच्या परिसरात लागलेल्या या पोस्टरवर ‘सिद्धी हेट्स शिवा’ असं लिहिण्यात आलं आहे. व्हॅलेंटाईन वीकदरम्यान शहरात लागलेले हे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहेत. हा पोस्टर कोणी आणि का लावला आहे, हे अद्यापही समोर आलं नाही. मात्र, तरूण तरुणींमध्ये अशी चर्चा आहे, की कोणाला तरी प्रेमामध्ये धोका मिळाल्यानं हे पोस्टर लावले गेले असावे. जवळपास पाच ते सहा जागी असे मोठमोठे होर्डींग लावले गेले आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या