JOIN US
मराठी बातम्या / Viral / अतिक अहमदच्या हत्येनंतर युपीतील कुख्यात गुंड घाबरले, धक्कादायक व्हिडिओ समोर

अतिक अहमदच्या हत्येनंतर युपीतील कुख्यात गुंड घाबरले, धक्कादायक व्हिडिओ समोर

उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांची गुन्हेगारांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड अतिक अहमदची हत्या करण्यात आली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विपिन गिरी (कानपूर), 21 एप्रिल : उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांची गुन्हेगारांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड अतिक अहमदची हत्या करण्यात आली. याचबरोबर त्याच्या मुलालाही पोलिसांनी मारलं. यामुळे युपी पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान युपीतील दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फरार असलेला आरोपी अचानक पोलिसांसमोर हजर झाला आहे. आपल्याला कोण ओळखू नये यासाठी तो बुरखा घालून कोर्टात पोहोचला आहे. मात्र कोर्टात तैनात असलेल्या पोलिसांची नजर त्याच्यावर पडली आणि पोलिसांना त्याचा बुरखा काढला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

प्रत्यक्षात बुरख्याच्या आत एक आरोपी होता जो पोलिसांच्या भीतीने कोर्टात आत्मसमर्पण करण्यासाठी आला होता. मात्र त्याची ही युक्ती पोलिसांसमोर कामी येऊ शकली नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही…., संतापात नवऱ्यानं ‘संसाराच्या वेली’चे केले तुकडे

संबंधित बातम्या

आफताब नावाचा आरोपी हापूर येथील मोती कॉलनी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांच्यावर बलात्काराचा खटला सुरू होता. वारंवार पोलिसांना चकवा देऊन आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

मात्र गुरुवारी आरोपी बुरखा घालून कोर्टात पोहोचला तेव्हा त्याला पोलिसांनी पकडले. सध्या हापूर नगर कोतवाली पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

वकिलाचा कोट घालून आला आणि महिलेवर झाडल्या 3 गोळ्या, दिल्लीच्या साकेत कोर्टातला LIVE VIDEO

या संदर्भात पोलिस अधिकारक्षेत्र शहर अशोक सिसोदिया सांगतात की, बुरखा घातलेला एक व्यक्ती कोर्टाच्या गेटवर आत जाण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान गेटवर तैनात असलेल्या पोलिसांनी संशयिताला पकडले. चौकशी केली असता मोती कॉलनीत राहणारा आफताबचा मुलगा नसीम हा बलात्काराच्या गुन्ह्यात वॉन्टेड होता. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या