नवी दिल्ली, 21 एप्रिल : देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न आजच्या घटनेमुळे निर्माण झाला आहे. दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिला जखमी झाली आहे. गोळीबाराची सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये आज दुपारी एका वकिलाने महिलेवर गोळीबार केला. वकिलांच्या वेशात हा हल्लेखोर आला होता होता. कोर्टाच्या आवारातच या हल्लेखोराची आणि जखमी महिलेची झटापट झाली. त्यानंतर पिस्तुल काढून त्याने 3 राऊंड फायर केले.
दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये गोळीबार pic.twitter.com/GQGstIQ1gx
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) April 21, 2023
हल्लेखोराने पहिली गोळी झाडल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी महिलेनं धाव घेतली. त्यानंतर त्याने तिचा पाठलाग करून गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे, हा गोळीबार सुरू असता कोर्टाच्या परिसरात चांगलीच गर्दी होती. (तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही…., संतापात नवऱ्यानं ‘संसाराच्या वेली’चे केले तुकडे) ही महिला . न्यू फ्रेंड्स कॉलनीशी संबंधित एका प्रकरणावर कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी आली होती अशी माहिती समोर आली आहे. त्यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने महिला आल्यावर तिच्यावर गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, हल्लेखोराने पीडित महिलेवर चार गोळ्या झाडल्यात. (प्रेम करणे गुन्हा आहे का? प्रेयसीच्या घरच्यांनी प्रियकराला घरी बोलवलं अन्…) गोळीबारात जखमी झालेल्या महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोर्टाच्या परिसरातच गोळीबार झाल्यामुळे कोर्टातील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.